इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने व आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा


प्रेस मीडिया लाईव्ह :

हातकणंगले तालुका प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे

इचलकरंजी ता.हातकणंगले येथे  भारतीय स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सव तसेच  ८ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज  इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने आणि आर्ट ऑफ लिव्हिंग इचलकरंजी यांच्या सहकार्याने नगरपरिषदेच्या राजाराम स्टेडियम येथे योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करणेत आला. यामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक विनायक मुरदुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी योग, प्राणायाम, तसेच ध्यान इत्यादी बाबींची प्रात्यक्षिके सादर केली.

    तसेच योग,प्राणायाम, ध्यान यामुळे जीवन तणावमुक्त जाण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर निरोगी आयुष्य जगण्यासाठी योगाचे अत्यंत महत्त्व असल्याने इचलकरंजी नगरपरिषदेच्या आवाहनाला उस्फूर्त प्रतिसाद देत  शहर वासीयांनी त्याचबरोबर नगर परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी राजाराम स्टेडियम येथे मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

       या कार्यक्रमा प्रसंगी माजी आमदार सुरेश हाळवणकर, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल , माजी नगराध्यक्षा अलका स्वामी, पोलिस उपअधिक्षक बाबुराव महामुनी, पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, माजी नगरसेवक अजितमामा जाधव, युवराज माळी प्रशासन अधिकारी प्राथमिक शिक्षण नम्रता गुरसाळे, महिला बाल कल्याण विभाग प्रमुख सीमा धुमाळ यांचेसह मोठ्या प्रमाणात  मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post