इचलकरंजी वाहतूक शाखेचे पोलीस इन्स्पेक्टर श्री विकास अडसूळ .
प्रेस मीडिया लाईव्ह :
घोसरवाड -देवाचं खरं अस्तित्व आईच असते ज्याला आई कळली त्याला जग कळले आईचा आशीर्वाद एक कर्तव्यदक्ष माणूस म्हणून काम करताना हवा आहे असा विचार इचलकरंजी वाहतूक शाखेचे पोलीस इन्स्पेक्टर श्री विकास अडसूळ यांनी व्यक्त केले.
ते घोसरवाड येथे फडतारे परिवाराच्या आदर्श माता श्रीमती रुक्मिणी फडतारे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार समारंभात बोलत होते अध्यक्षस्थानी कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी बालाजी भांगे उपस्थित होते प्रथम स्वागत प्रास्ताविक विजय फडतारे यांनी केले त्यानंतर हवीस तू आई या विषयावर व्याख्यान झाले तसेच आई याविषयी कवी दस्तगीर नदाफ यांनी काव्य वाचन केले त्यावेळी इचलकरंजी, खोतवाडी, शिरदवाड, लाट ,शिरढोण, दत्तवाड ,दानवाड, खिद्रापूर, टाकळीवाडी, अकिवाट,सैनिक टाकळी ,कुरुंदवाड, येथील पत्रकारांचा सत्कार जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, श्रीमंत सरकार विजितसिह शिंदे, काँग्रेस तालुका महिला अध्यक्षा मीनाज जमादार ,दत्त कारखाना व्हाईस चेअरमन अरून देसाई, माजी व्हाईस चेअरमन इंद्रजीत पाटील ,घोसरवाड सरपंच साहेबराव साबळे ,दत्तवाड सरपंच चंद्रकांत कांबळे ,हेरवाड सरपंच सुरगोंड पाटील ,नवे दानवाड सरपंच श्रीमती वंदना कांबळे, खिद्रापूर सरपंच हैदरखान मोकाशी ,दत्त संचालक रावसाहेब नाईक ,माजी सरपंच मयूर खोत, स्वाभिमानी अध्यक्ष भूपाल नाईक,रणरागिनी महिला मंडळ, विश्वविनायक तरुण मंडळ, सत्कार समिती ,शांतादुर्गा महिला बहुउद्देशीय संस्था, या संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते शेवटी आभार धनपाल जुगळे सर यांनी मानले.