बारावीचा निकाल उद्या ऑनलाईन पद्धतीने पाहता येईल

  यंदाच्या निकालाची विद्यार्थ्यांना अधिकची उत्सुकता असणार आहे.

प्रेस मीडिया लाईव्ह

अन्वरअली शेख

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच बारावीचा निकाल करणार असे बोर्डाकडून अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे .महाराष्ट्र एचएससी निकाल या पूर्वी १० जून २०२२ रोजी वेबसाईटवर प्रसिद्ध होणार असे अपेक्षित होते . 

  परंतु आता ८ जून बुधवार २०२२ रोजी जाहीर होणार  आहे . दुपारी चार नंतर  हा निकाल जाहीर केला जाईल . उमेदवारांनी निकालासंबंधित सर्व नवीन माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाइट तपासत रहावे .

कोरोना महामारी व लोक डाऊन मुळे यंदा विद्यार्थ्यांनी घरातून  ऑनलाईन क्लासच्या मार्फत शिक्षण  घेतले होते  मात्र, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे, यंदाच्या निकालाची विद्यार्थ्यांना अधिकची उत्सुकता  असणार आहे.

उद्या म्हणजे बुधवार ८ जून रोजी दुपारी चार वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार Maharashtra Board HSC Result Date 2022 Confirmed आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांना आता चांगलीच उत्सुकता लागली आहे. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन हा निकाल पाहता येये. 

        या वेबसाईटवर जाऊन निकाल पाहता येईल  

१)  mahahsscboard.in       २)  hscresult.mkcl.org 

३)  mahresult.nic.in

  किंवा होमपेजवर , MSBSHSE १२ वी निकाल २०२२ या लिंकवर क्लिक करा , निकाल जाहीर होताच लिंक सक्रिय होईल . तुमचा रोल नंबर व जन्मतारीख एंटर करा , कॅप्चा टाका आणि सबमिट वर क्लिक करा . तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल , तुम्ही खाली डाउनलोड करून सेव्ह करून डेस्कटॉपवर सेव्ह करू शकता .


प्रेस मीडिया लाईव्ह

सह संपादक अन्वरअली शेख 

Post a Comment

Previous Post Next Post