बेडकिहाळ येथे साहित्य संमेलन थोर विचारवंतांच्या उपस्थित पार पडले.

2 रे मराठी साहित्य संमेलन - अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ.विनोद गायकवाड 

प्रेस मीडिया लाईव्ह 

बेडकिहाळ येथे 26 जुन रोजी कै. बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने 2 रे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन 26 रोजी देशभक्त रत्नाप्पाना कुंभार सभागृह, बी.एस.कंपोजिट ज्युनिअर कॉलेज बेडकिहाळ येथे हजारोंच्या उपस्थितीत उत्साहात कार्यक्रम पार पडला.


कार्यक्रमाची सुरुवात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मा. मलगौंडा पाटील यांच्या हस्ते हार घालून करन्यात आला. तेथुन ग्रंथ व पालखी पुजणाला सुरुवात झाली.  ग्रंथ व पालखी पुजण मा. दत्तात्रय पाटील.उधोजक,सौ.डॉ.सुमित्रा पाटील उधोजिका यांच्या हस्ते करण्यात आले. तेथुन साहित्य नगरी पर्यंत  ग्रंथदिंडी पालखी मा. बेडकिहाळ व परिसरातील मान्यवरांच्या उपस्थितीत हलगीच्या निनादात पालखी मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर स्वातंत्र्यसेनानी स्व.रामचंद्र चव्हाण प्रवेशद्वार उद्घाटन दत्तात्रय पाटील उधोजक कोल्हापूर यांच्या हस्ते करण्यात आले. स्व.गोपाळदादा पाटील साहित्य नगरी उद्घाटन सुदर्शन खोत जिल्हा पंचायत सदस्य, शमनेवाडी यांच्या हस्ते करण्यात आले. स्व.अशोकआण्णा नारे  व्यासपीठ उद्घाटन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दिपप्रज्वलन मा.प्रा.डॉ.डी एस चौगुले.ज्येष्ठ कन्नड साहित्यिक, बेळगावी तसेच ग्राम पंचायत अध्यक्षा सौ.विध्या देसाई व सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.


भगवाण गौतम बुद्ध प्रतिमा पुजण मा.तात्यासाहेब खोत.. उपाध्यक्ष, बी.एस.संयुक्त पदवीपुर्व  महाविद्यालय बेडकिहाळ, शमनेवाडी यांच्या हस्ते, भगवाण महावीर प्रतिमेचे पूजन मा.एम.एस.कट्टी. प्राचार्य, बी.एस.पदवीपुर्व महाविद्यालय,बेडकिहाळ, महात्मा बसवेश्वर प्रतिमेचे पूजन मा.बाबण्णा खोत. अध्यक्ष, जय जिनेंद्र सौहार्द शमनेवाडी, संत ज्ञानेश्वर प्रतिमा पुजण मा.रावसाहेब मेलाळे‌.सामाजिक  कार्यकर्ते सदलगा, छ.शिवाजी महाराज प्रतिमा पुजण मा.दत्तकुमार पाटील.उपाध्यक्ष अर्बन को-ऑप सोसा.लि.बेडकिहाळ, राजर्षी छ. शाहू महाराज प्रतिमा पुजण मा.शितल खोत  यशस्वी उद्योजक शमनेवाडी, म.ज्योतिबा फुले डॉ.बाळासाहेब उदगट्टी.बेळगाव, सावित्रीबाई फुले प्रतिमा पुजण ऍड. निरंजन कांबळे.नेज, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा पुजण डी. एस. डोणे.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते इचलकरंजी,साहित्यिक आण्णाभाऊ साठे प्रतिमा पुजण मा.वि.गो वडेअर सर, या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

  कार्यक्रमाची सुरुवात स्नेहा कांबळे यांच्या स्वागत गिताने करन्यात आले. त्यानंतर स्वागत कै.बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ विक्रम शिंगाडे यांनी केले. तर प्रास्ताविक मा.प्रा.प्रकाश कदम कोगनोळी यांनी केले. त्यानंतर सर्व मान्यवरांचा सत्कार डॉ. विक्रम शिंगाडे यांनी केला. 

   उद्दघाटक.प्रा.डॉ.डी. एस. चौगुले म्हणाले की कन्नड व मराठी कोणतीही भाषा असुदे भाषेवर प्रेम असले पाहिजे. भाषेविषयी तेड निर्माण करुन राजकारण करत बसु नये. सर्व भाषावंर आपले प्रेम असले पाहिजे. असे ते म्हणाले. 

  म.नि.प्र.प.पू.गुरुसिध्देश्वर महास्वामाजी म्हणाले की आधुनिक युगात साहित्य संमेलनाचे आयोजन करणे एवढे सोपे नाही. पण डॉ. विक्रम शिंगाडे यांनी आजच्या युवा पिढीला साहित्याची जाणीव व्हावी. म्हणून या मोठ्या साहित्य संमेलनाचे आयोजन केले. डॉ.विक्रम शिंगाडे सारखे प्रामाणिक लढाऊ कार्यकर्ता प्रत्येक गावा गावात असला पाहिजे. तसेच आज भाषा बांधव्य प्रत्येकाने जपले पाहिजे असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. विनोद गायकवाड. ज्येष्ठ साहित्यिक, विभागप्रमुख-मराठी विभाग राणी चन्नमा विद्यापीठ, बेळगावी म्हणाले की   आधुनिक युगात आपण जगताना कसे जगतो, ते फार महत्त्वाचे  बनत चालले आहे. साहित्य निर्माण करणार्यांना आता नवीन जगाची दिशा दिसु लागली आहे. साहित्य निर्मितीतील भाषेचा अडसर आता बाजूला पडत चालला आहे. युवावर्गाने नवनवीन साहित्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन त्यांनी केले. 

   दुसर्या सत्रामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून क्रुषीपंडित मा.सुरेश देसाई हे लाभले होते.  तसेच मा.श्रीराम पंचिद्रे.ज्येष्ठ साहित्यिक, संपादक, कोल्हापूर यांनी राजर्षी शाहू- देशाच्या इतिहासातील नवी पहाट या विषयावर व्याख्यान दिले.  

  तिसऱ्या सत्रात 10 वी व 12 मध्ये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना शाल, सन्मानचिन्ह, पेन, फुल देऊन सत्कार करण्यात आला. तर सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणी लोकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

  त्यानंतर मा.प्रा.शांतिनाथ मांगले.ज्येष्ठ साहित्यिक, कथाकार सांगली यांचा कथाकथनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

  कार्यक्रमास इंद्रजित पाटील चेअरमन बी.एस.कंपोजिट कॉलेज बेडकिहाळ, प्रा.डॉ.गोपाळ महामुणी, जयश्री  जाधव ग्राम पंचायत उपाध्यक्षा बेडकिहाळ, सागर  केसरकर. उधोजक बेडकिहाळ, डॉ.सुरेश कुराडे.गडिग्लंज, बाळासाहेब शिंदे, महावीर पाटील, अशोक झेंडे. ग्राम विकास अधिकारी बेडकिहाळ, दादु सनदी, संपत बोरगल, दादा अरदाळे, अभयकुमार खोत, दादा पाटील, बाबु नारे,  सुरेश गोणे, बंडा जोशी, शरद जाधव, जीवन यादव यांच्यासह समविचारी पत्रकार संघ सदलगा सर्व सदस्य, कर्तव्य फाऊंडेशन सर्व सदस्य, शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी, तसेच बेडकिहाळ व परिसरातील साहित्य प्रेमी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड.प्रिती हट्टीमणी व  तानाजी बिरनाळे यांनी केले. तर अजित कांबळे यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post