शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती येथे जागतिक रक्तदाता दिन संपन्न

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

बारामती दि. 15: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय बारामती येथे जागतिक रक्तदाता दिन मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

            वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उप अधिष्ठाता डॉ. विवेक सहस्त्रबुद्धे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमोल शिंदे, शरीरविकृतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शारदा राणे, सहयोगी प्रा. डॉ. मीनल शिंगाडे, स्थायी समिती सदस्य पत्रकार मिलींद संगई आदी उपस्थित होते

जागतिक रक्तदाता दिन दरवर्षी एका नव्या घोषवाक्यावर साजरा केला जातो. यंदाचे घोषवाक्य 'रक्तदान करणे हे एक जुटीचे कार्य आहे या प्रयत्नांमध्ये सामिल व्हा आणि जीव वाचवा' असे आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शरीरविकृतीशास्त्र विभागाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यामध्ये प्रभातफेरी, रक्तदान शिबिर व विद्यार्थी यांनी पथनाटय सादर केले. सर्व अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांनी रक्तदानाविषयी प्रतिज्ञा घेतली. पथनाट्यमध्ये रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांनीही सहभाग घेतला. पथनाट्यद्वारे विद्यार्थीनी रक्तदानाच्या महत्त्वाबाबत जन जागृती करून सर्वांना स्वेच्छेने रक्तदान करण्याचे आवाहन केले. रक्तसंकलन इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित लेट माणिकबाई चंदुलाल सराफ ब्लड बँक बारामती यांनी केले. यावेळी 56 रक्तदात्यांनी उत्फूर्तपणे रक्तदान केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायोगी प्राध्यापक डॉ. मंगेश सांगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक प्राध्यापिका डॉ. वर्षा वाघ यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post