जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत जंत निर्मूलन मोहीम शिबिरे

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

सातारा दि.25- आजादी का अमृत महोत्सव व पशुसंवर्धन दिन याचे औचित्य साधून आज 25 मे रोजी जिल्हा पशुसंवर्धन विभाग सातारा मार्फत जंत निर्मूलन मोहीम स्वरूपात शिबिरे घेण्यात आली.   शिवाजीनगर शिरवळ येथील शिबिरासाठी पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा विनय गौडा, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, माजी पशुसंवर्धन सभापती मनोज पवार आदी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यामध्ये सदर योजनेअंतर्गत एकूण 450 पथके तयार करून एकाच दिवशी ९०० गावात जंत निर्मूलन कार्यक्रम घेण्यात आला आहे.  यासाठी ८.४६ लक्ष जी. प.सेस नाविन्यपूर्ण योजना म्हणून करण्यात आली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post