कला व क्रीडा शिक्षक संच मान्यतेत स्वतंत्र सुधारीत निकष करावा .
प्रेस मीडिया लाईव्ह :
सातारा दि.२५ छत्रपती राजश्री शाहू महाराज कला शिक्षक व क्रीडा शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य यांनी शरद पवार अध्यक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे )व अध्यक्ष रयत शिक्षण संस्था सातारा यांना निवेदन देण्यात आले. त्या वेळी आदरणीय शरदचंद्रजी पवार.साहेब .अध्यक्ष रयत शिक्षण संस्था सातारा.यांच्याशी शैक्षणिक धोरणानुसार संचमान्यतेमध्ये कला शिक्षक व क्रीडा शिक्षक यांचेवर होत असणारे अन्याय या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली.यावेळी छत्रपती राजर्षी शाहू महाराज. कला व क्रीडा शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री.सुनील शिखरे.सर , संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष श्री.सुनील जाधव.सहसचिव श्री.पुरूषोत्तम सावंत.सर.अजित काळे.सर इ... उच्च माध्यमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक पदांसाठी संच मान्यतेत दुरुस्ती करून कला व क्रीडा शिक्षक संच मान्यतेत स्वतंत्र सुधारीत निकष करावा
१३ जुलै , २०२० च्या नवीन शैक्षणिक पोरणांनुसार कला क्रीडा आणि कार्यानुभव या विषयांवर अन्याय होत असल्याने नवीन शैक्षणिक धोरणांनुसार संच मान्यतेत वरील विषयांना दुय्यम स्थान दिल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या विषयाचे अध्यापन होणार नाही . राज्य शासन एका बाजुने सांगते आहे की , कला विषयातून अनेक कला वंत तयार होणे आवश्यक आहे . त्याचप्रमाणे क्रीडा विषयातून अनेक खेळाडू तयार होणे आवश्यक आहे . असे शासनाकडूनच परीपत्रके निर्गमित करण्यात येत असतात . १३ जुलै , २०२० च्या नवीन शैक्षणिक धोरणात कला शिक्षक व क्रीडा शिक्षक संच मान्यतेत ही पदे १५ शिक्षकांच्या नंतर दर्शविली आहेत . त्यामुळे ग्रामीण भागातील माध्यमिक शाळांमध्ये १५ शिक्षकांची क्वचित एखादी शाळा असेल तर नाही एक ही शाळा १५ शिक्षकांची ग्रामीण भागांत शाळा नाही . शासनाच्या ध्येय धोरणांनूसार अनेक कलावंत व अनेक खेळाडू तयार होऊ शकत नाहीत . त्यासाठी शाळा तिथे कला शिक्षक व क्रीडा शिक्षक असणे गरजेचे आहे . पुर्वी प्रमाणे संच मान्यतेत स्पेशल टीचर ही पदे निर्माण करण्यात यावीत . तरच ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना कला व क्रीडा विषयाचे ज्ञान मिळण्याचा मार्ग सोप्पा करावा .
*छत्रपती राजश्री शाहू महाराज कला शिक्षक व क्रीडा शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख मागण्या*
१ ) कला शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार ए.टी.डी. टू ए एम ३० जुलै १ ९ ८० च्या जी.आर नुसार पदवीधर वेतन श्रेणी मिळावी . २ ) नेमणुक दिनांकानुसार सेवा जेष्ठता यादीत समावेश करण्यात यावे . ३ ) ज्या कला शिक्षकांना पदवीधर वेतन दिले आहे . अशा कला शिक्षकांना क संवर्गामध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे . ४ ) कला शिक्षक व क्रीडा शिक्षकांची भरती करून शाळा तिथे कला व क्रीडा शिक्षक पद संच मान्यतेत निर्माण करण्यात यावेत . ५ ) शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये संच मान्यतेत दुरुस्ती करून स्पेशल टीचर पद दाखवण्यात यावे . ६ ) कला शिक्षकांना शैक्षणिक अर्हतेनुसार प्रमोशन देण्यात यावे , अशा प्रकारे आमच्या कला व क्रीडा शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी छत्रपती राजर्षी शाहु महाराज कला शिक्षक व क्रीडा शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य हा कला शिक्षक व क्रीडा शिक्षक यांना न्याय आणि सन्मानासाठी राज्यस्तरावर कार्यरत असणारे नोंदणीकृत शिक्षक संघटना असुन आज पर्यंत कला शिक्षक व क्रीडा शिक्षक विषयाच्या अनुषंगाने अनेक विषयांवर संघटनेने शासन दरबारी आपली भुमिका मांडली आहे . आमच्या संघटनेचे कार्य कला क्रीडा विषय शिक्षक यांचे केंद्रस्थानी मानून सुरु आहे .
त्याचप्रमाणे अभ्यासु व कार्यतत्पर तसेच शैक्षणिक क्षेत्र व राजकीय क्षेत्रात आपली ओळख संपूर्ण महाराष्ट्र राज्यात व देशात आहे . आपल्या व्यासंगातून आणि अनुभवातून शिक्षण क्षेत्रातील कला व क्रीडा विषयाचे अनेक प्रश्न मार्गी लागतील हा आम्हांस विश्वास आहे .