व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ मुळे लाचखोर शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता

दोघांवर विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये लाचलुचपत प्रतिबंध..क अधिनियमाखाली गुन्हा दाखल..



प्रेस मीडिया लाईव्ह :


 सांगली जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाचा शिक्षण अधिकारी व अधीक्षक लाचप्रकरणात लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडल्या मुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे . काही दिवसांपूर्वी तीन शिक्षकांकडून पदवीधर वेतन श्रेणी मान्यता मिळवून देण्याच्या बदल्यात प्रत्येकी 60 हजार रूपये प्रमाणे लाचचेची मागणी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. या प्रकरणी लाचखोर शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे चा व्हिडीओ समोर आला आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमुळे जोरदार खळबळ माजली आहे. तर विष्णू कांबळे हे 30 जून रोजी निवृत्त होणार होते. 

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ मध्ये, "मंत्र्यांच्या गाडीत पेट्रोल टाकावं लागत , पीए येतात, त्यांना पाकीट द्यावं लागतं. हॉटेलला मुक्कामी असले की रुमचे, खाण्या-पिण्याचे भाडे द्यावे लागते. दर 15 दिवसाला हे सगळं करावं लागतं, त्यांना आम्ही नाही म्हणू शकत नाही." , असं विष्णू कांबळे बोलत आहेत. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे लाचखोर शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

तीन शिक्षकांकडून पदवीधर वेतन श्रेणी मान्यता मिळवून देण्याच्या बदल्यात प्रत्येकी 60 हजार रूपये प्रमाणे लाचेची मागणी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. विष्णू कांबळे आणि विजयकुमार सोनवणे अशी लाच स्वीकारलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. 1 लाख 70 हजार रूपयांची लाच स्विकारताना सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रात्री दोघांना लाचेच्या रकमेसहीत पकडलं होतं. दोघांवर विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सांगली जिल्हा परिषदेतील सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

तक्रारदार आणि त्यांचे दोन शिक्षक मित्र यांचे पदवीधर वेतन श्रेणी मान्यता मिळण्याबाबत प्रस्ताव शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, सांगली यांच्याकडे दिला होता. सदरचे काम करून देण्यासाठी शिक्षण अधिकारी कांबळे आणि अधीक्षक सोनवणे यांनी तक्रारदार, त्यांचे शिक्षक मित्र यांच्याकडे प्रत्येकी 60 हजार रूपये प्रमाणे लाचेची मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज 26 एप्रिल रोजी अॅन्टी करप्शन ब्युरो सांगली पथकास दिला होता.

Post a Comment

Previous Post Next Post