याबाबत लोकप्रतिनिधी, विरोधी पक्ष मूग गिळून गप्प...
प्रेस मीडिया लाईव्ह :
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. प्रत्येक पक्ष, नेता आपापली भाषा बोलू लागला आहे. या कुरघोड्यांमध्ये सर्वसामान्यांचे जिव्हाळ्याचे महत्त्वाचे प्रश्न मात्र बाजूला राहिले आहेत. राज्यात सध्या फक्त वेगवेगळ्या विषयांवर राजकारण सुरू आहे. या राजकीय साठमारीत महागाईचा आवाज दबला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी सर्वसामान्यांच्या मानगुटीवर महागाईचे भूत बसल्याने नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत, मात्र याबाबत लोकप्रतिनिधी, विरोधी पक्ष मूग गिळून गप्प असल्याचे दिसून येत आहे.
अनवर बाबा : (आम आदमी पार्टी )
राज्यातील राजकारण दिवसेंदिवस खालची पायरी गाठत आहे. एकमेकांच्या विरोधात वेगवेगळ्या पक्षांतील नेते खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत. जाती-धर्माच्या नावावर राजकारण ढवळून निघत आहे. आपापल्या नेत्यांवरील आरोपांना कार्यकर्ते उत्तरे देत आहेत. राजकारण्यांची वैयक्तिक आरोपांपासून घरातील सदस्यांवर आरोप करण्यापर्यंत मजल पोहचली आहे. देवाच्या नावावर वातावरण पेटवले जातआहे. नेत्यांपासून निघालेले हे विषय आता गावागावात,वाड्यावस्त्यांवर पोहचले असल्याने दिल्ली ते गल्लीपर्यंतचर्चांना उधाण आले आहे. आपलाच नेता कसा खरा आहे?
हे इतरांना पटवून देण्यासाठी कार्यकर्ते गावागावांत काम करताना दिसत आहेत.करोनामुळे अनेक व्यवसाय संकटात येऊन बंदपडले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर अनेकांच्या घरातीलसदस्य, काहींच्या घरातील कर्ता माणूस गेला. अशा अनेक अडचणींवर मात करीत सर्वसामान्य माणूस दिवस काढत आहे. सत्ताधारी व विरोधी राजकीय पक्षांनी लोकांच्या विविध समस्या व अडचणी लक्ष घालून सोडवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र, प्रत्येकजण सध्या एकमेकांची जिरविण्यासाठी आखाड्यात उतरल्याचे दिसून येत आहे