प्रेस मीडिया लाईव्ह
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहनांचा वेग मंदावला आहे. प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.खालापूर टोल नाक आणि बोर घाटात मोठी कोंडी पाहायला मिळत आहे. दोन्ही लेन वरती वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. विकेंड आणि सलग लागून आलेल्या सुट्या यामुळे वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मुबंई पुणे एक्सप्रेस हायवेवर खालापूर टोलनाका आणि बोरघाटात वाहतुक कोंडी झाली आहे. विकेंड तसेच अवजड वाहनं मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे छोट्या वाहन चालकांना वाहतूक कोडींचा त्रास सहन करावा लागत आहे. बोरघाटात अम्रृतांजन पुलापासून दोन्ही बाजुला 2-3किमीच्या रांगा लागल्या आहेत. अत्यंत धिम्या गतीने वाहनं पुढे सरकत आहेत. खडांळा लोणावळा दिशेनं आणि मुबंईच्या दिशेने वाहतुक धिम्या गतीने सुरु आहे.
पुणे - मुंबई एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाल्याने अनेकांना याचा फटका बसला आहे. बोरघाटात अम्रृतांजन पुलापासून दोन्ही बाजुला 2-3 किमी च्या रागां लागल्या असतानाच खडांळा लोणावळा दिशेने आणि मुबंई दिशेने 2-3 किमी वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे मुंबई - पुणे एक्स्प्रेस हायवेवर प्रवास करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.