महपालिका अभियांत्रिकी संवर्गातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य )या पदाचे अर्जदार कर्मचारी वर्ग पदोन्नतीच्या प्रतीक्षेतच
प्रेस मीडिया लाईव्ह :
जीलानी उर्फ मुन्ना शेख
पुणे दि.१ जून ,पुणे महापालिकेतील कर्मचारी निवड प्रक्रिया प्रलंबित होत असल्यामुळे आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदा करीता अर्ज करणारे कर्मचारी यांना वाऱ्यावर सोडून दिल्यासारखे असल्याचे सांगितले जात आहे , एक अर्जदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की या बाबत चर्चा सुरू झाली तरी अध्याप निवड प्रक्रिया राबवण्यात येत नाही.
सविस्तर माहिती अशी...
,महानगरपालिकेतील कार्यरत कर्मचाऱ्यांमधून किमान ५ वर्षाचा अनुभव व शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या सेवकांची कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) या पदावर पदोन्नतीने नियुक्ती करण्याचा परिपत्रक काढले आहे.
कार्यालयीन परिपत्रक संदर्भ क्र . १ व संदर्भ २ , ३ चे मान्यता नुसार अर्जामधील तपशिल व मा . पदोन्नती समितीच्या अंतिम निर्णयास अधीन राहून पात्र सेवकांची सेवाजेष्ठता यादी प्रारूप स्वरुपात प्रसिध्द करण्यात येत आहे . सदर यादी पुणे महागनरपालिकेच्या https://pmc.gov.in/en/circulars या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे .
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील " कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) " या पदाकरिता बढ़तीने नेमणूकासाठी विहीत शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या पुणे महानगरपालिकेतील कार्यरत कर्मचान्यामधून सेवाजेष्ठता , गुणवत्ता व किमान ५ वर्षाचा अनुभ व असणाऱ्या सेवक कर्मचारी यांचेमधून पदोन्नतीने नेमणूक करणेकामी संदर्भ क्र . १ अन्वये कार्यालय परिपत्रक प्रसृत करुन अर्ज मागविण्यात आले होते .
महानगरपालिका प्रशासनाकडील तृतीय / चतुर्थ श्रेणी संवर्गातील ज्या सेवकांची शेड्युलमान्य पदावर नेमणूक करण्यात आलेल्या कार्यरत सेवकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत . अशा पात्र सेवकांच्या नावाचा समावेश सदर सेवाजेष्ठता यादीमध्ये करण्यात आला आहे . सदर यादीतील सेवक / कर्मचारी यांनी स्वतःचे नांव , जात , जातीचा गट , शैक्षणिक पात्रता , जन्मदिनांक , नेमणूकीचे दिनांक इ . सर्व बाबींची पाहणी करुन सोबत जोडलेल्या सेवाजेष्ठता यादीतील आपल्या नावांसमोर स्वाक्षरी करावी . P सदर यादीमध्ये घेण्यात आलेल्या नोंदीबाबत काही आक्षेप / चुका असल्यास हे कार्यालय परिपत्रक प्रसिध्द झाल्याचे दिनांकापासून ७ दिवसाचे मुदतीत ( दि . १३/१२/२०२१ ) आपले आक्षेप लेखी स्वरुपात , कागदपत्रांच्या पुराव्यासहीत आस्थापना विभाग , रुम नं . २४० , पुणे महानगरपालिका , मुख्य इमारत येथे कार्यालयीन वेळेत सादर करावे . त्यानुसार सदरच्या नोंदी घेवून अंतिम सेवाजेष्ठता सूचीस मान्यता घेवून ती प्रसिध्द करण्यात येईल . तसेच मुदतीनंतर आलेल्या आक्षेपांचा किंवा अंतिम सेवाजेष्ठता यादी प्रसिध्द केल्यानंतर त्यामध्ये दुरुस्त्या सुचविण्यात आल्यास त्यांची दखल घेतली जाणार नाही . तसेच संबंधित सेवक / कर्मचारी यांचे शैक्षणिक अर्हतेच्या कागदपत्राबाबत तक्रार आल्यास व त्यामध्ये तथ्य आढळल्यास संबंधित सेवक / कर्मचारी यांची नेमणूक कोणत्याही टप्प्यावर संपुष्टात आणणेबाबत अलाहीदा निर्णय घेण्यात येईल .