महानगरपालिका जो पर्यन्त हा निर्णय मागे घेत नाही तो पर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार..काँग्रेस
प्रेस मीडिया लाईव्ह :
जीलानी उर्फ मुन्ना शेख :
पुणे : बाल गंधर्व हे पुण्याचे सौंदर्य आहे ते पाडून पुण्याचे सौंदर्य नष्ट होऊ देणार नाही या साठी काँग्रेसने बालगंधर्व रंगमंदिर वाचवण्यासाठी बालगंधर्व आंदोलन जोरदार सुरू केले आहे.
बालगंधर्व पाडण्याचा प्रस्ताव महानगरपालिकाने काही वर्षा पूर्वी मांडला होता व त्याच्या प्रस्तावाची चर्चा सुरू होती , बालगंधर्व आमच्या हक्काचे आहे , नाही कोणाच्या बापाचे , अशी जोरदार घोषणा काँग्रेसने दिली. महानगरपालिका जो पर्यन्त हा निर्णय मागे घेत नाही तो पर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे काँग्रेसने सांगीतले आहे. पुण्याची संस्कृती खराब करण्याचे काम भाजपचे आहे याला काँग्रेसचा जोरदार विरोध असेल . या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे , नंदकिशोर कपोते , व काँग्रेस चे इतर पदाधिकारी उपस्थित होते.