प्रेस नोट
नव्या पिढीने उद्योजकतेत पराक्रम गाजवावा : अभिनेते अजय पुरकर
उद्योजकतेला वाव देण्यासाठी रोटरीचा पुढाकार ..
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : नव उद्योजकांना तसेच छोटया व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी 'रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन' ने आयोजित केलेल्या 'कोथरूड शॉपिंग फेस्टिव्हल ' या महोत्सवाचे उद्घाटन अभिनेते अजय पुरकर यांच्याहस्ते २८ मे रोजी सकाळी १० वाजता झाले.
गांधी भवन, कोथरूड येथे हा महोत्सव २८ व २९ मे रोजी दोन्ही दिवशी सकाळी १० ते रात्री ८ या वेळात होत आहे.
रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवनचे अध्यक्ष मनीष धोत्रे, माजी प्रांतपाल मोहन पालेशा, 'गंगोत्री होम्स अॅण्ड हॉलिडेज ' चे संचालक गणेश जाधव, राजेंद्र आवटे, अनिकेत साळुंखे, शशांक टिळक, शशांक सप्रे, पुष्कर मोकाशी, संयोजन समितीच्या सदस्य डॉ. ऋचा वझे -मोकाशी, दीपा पुजारी इत्यादी मान्यवर उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.गंगोत्री होम्स अॅण्ड हॉलिडेज ', वसू इव्हेंटस् यांच्या सहकार्याने हा महोत्सव होत आहे.
. या महोत्सवात खरेदीसाठी कपडे,पुस्तके,दागिने ,बॅग्ज ,फर्निचर ,कॉस्मेटिक्स अशी विविध दालने तसेच अनेक खेळ आणि खाद्यपदार्थांचे एकूण ६४ स्टॉल यांचा समावेश आहे. येणाऱ्या ग्राहकातून लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. स्वयंसेवी संस्थांच्या कामाची माहिती देणारे दालनही येथे आहे.
' नव्या पिढीसमोर नवीन आव्हाने असून त्यांना मर्दुमकी गाजवायला भरपूर क्षेत्र उपलब्ध आहे. त्यातील उद्योजकता हे महत्वपूर्ण क्षेत्र असून त्यात नव्या पिढीने पराक्रम गाजवावा, असे प्रतिपादन अजय पुरकर यांनी केले.
'विक्रेते आणि ग्राहक दोघांसाठी ही सुवर्णसंधी असून जास्तीत जास्त नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा', असे आवाहन रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवनच्या संयोजन समितीच्या सदस्य डॉ. ऋचा वझे -मोकाशी, दीपा पुजारी यांनी केले .महोत्सवाच्या आयोजनातून मिळणारा निधी सामाजिक कार्याला देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.