प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद , पंचायत समिती , ग्राम पंचायती आणि शहरातील महानगरपालिका , नगरपालिका , नगरपंचायती , या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास (ओबीसी , व्हीजेएनटी ) आरक्षण देण्यासाठी मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग घटित केला आहे.
महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थां मधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी या समर्पित आयोगाने विभागवार कार्येक्रम जाहीर केला आहे. पुणे विभागातील समर्पित आयोगाचा भेटीचा कार्येक्रम शनिवार दिनांक २१.मे.२०२२ रोजी सकाळी ९.३०. ते ११.३० वा. या वेळेत विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे आयोजित करण्यात आलेले असून या बाबत ची निवेदने दिनांक.२०.मे २०२२ रोजी सायंकाळी ६.३० वा.पर्यन्त मा. विभाग आयुक्त पुणे आणि मा. जिल्हाधि कार्यालाय पुणे येथे स्वीकारण्यात येणार आहेत.
तरी ज्या नागरिकांना / या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटनाना निवेदन सादर करावयाची असल्यास त्यांनी आपले संपूर्ण नाव, पत्ता , भ्रमण ध्वनी क्र. आणि ईमेल अड्रेस ई. माहिती नमूद करून दिनांक २०.मे २०२२. रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मा. विभागीय आयुक्त कार्यालय पुणे व जिल्हाधिकाऱ्यालय पुणे नोंदणी करावी असे आवाहन पुणे महानगरपालिकाचे उपायुक्त यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आले