मुस्लिम, हिंदू, पारसी, शीख, बौद्ध अशा सर्व धर्मगुरूंना एका व्यासपीठावर एकत्र आणून आपण एकतेचा संदेश देतोय.... शरद पवार..



प्रेस मीडिया लाईव्ह : 

जीलानी उर्फ मुन्ना शेख :

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार  यांनी 'ईद मिलन' या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेकडो नागरिकांना संबोधीत केलं.जातीपातीच्या राजकारणा पलीकडे जावून शरद पवार यांनी सर्व धर्म गुरुंना एकाच व्यासपीठावर आणून एकतेचा संदेश दिला. पुण्यात 'ईद मिलन' कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधताना पवार म्हणाले, मुस्लिम, हिंदू, पारसी, शीख, बौद्ध अशा सर्व धर्मगुरूंना एका व्यासपीठावर एकत्र आणून आपण एकतेचा संदेश देतोय. आपला देश अनेक जाती आणि धर्मांचा देश आहे. हे सर्व आपलं सौंदर्य आहे. हे सौंदर्य उठून ठेवण्यासाठी याला लागलेल्या विविध फुलांचा सन्मान केला पाहिजे. पण आपल्यामध्ये कुणी जातीय द्वेष   निर्माण करत असेल,तर त्यांना धडा शिकवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे.असं आवाहन शरद पवार यांनी उपस्थित शेकडो नागरिकांना केलं आहे. ते पुण्यात आयोजित केलेल्या ईद मिलन कार्यक्रमात बोलत होते.



देशाचा मंत्री आणि क्रिकेटच्या माध्यमातून अनेकवेळा पाकिस्तानला गेलो. पाकिस्तानात एकवेळा जेवण करायला गेल्यानंतर आमच्या जेवणाचे त्यांनी पैसे घेतले नाहीत. आम्ही त्यांचे पाहुणे आहोत म्हणून आमचा आदर केला गेला.पाकिस्तानचा सामान्य माणूस आपला विरोधक नाहीये.फक्त राजकीय लोक तशी परिस्थिती निर्माण करतात. तेथील लोकांचे नातेवाईक भारतात आहेत, तर भारतातील नागरिकांचे नातेवाईक पाकिस्तानात आहेत.ईद मिलन कार्यक्रमाच्या माध्यमातून पवारांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. 

आज जगा मध्ये जे चित्र आहे. तशी परिस्थिती आपल्याकडे होऊ द्यायची नसेल तर आपण एकत्र येणं गरजेचं आहे. या कार्यक्रमामध्ये आलेले सर्वजण सर्वाधर्मीय, सर्वपक्षीय आहेत. पुणे शहरातून शांततेचा आणि भाईचारेचा संदेश आपण देऊया.सर्वजण प्रत्येक धर्माच्या मनावतेच्या विचाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुया अशा शब्दांत शरद पवारांनी नागरिकांना संबोधीत केलं.तसंच शरद पवारांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याबाबती वक्तव्य केलं. यावर बोलताना पवार म्हणाले, तंत्र्याच्या आंदोलनामध्य जसे नेहरू,बोस होते तसें मौलाना अब्दुल कलामही होते.त्यामुळे आपल्या एकोप्यामुळं इंग्रजांना देश सोडून जावं लागलं. .मूलनिवासी मंचच्या काही कार्यकर्त्यांनी कोविड काळात डेड बॉडी उचलण्याचं काम केलं. कोविड काळात या संघटनांनी सर्व जातीधर्माच्या लोकांचा अंत्यविधी स्वखर्चात केला.अशा लोकांची समाजाला गरज आहे.

Post a Comment

Previous Post Next Post