भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम ..
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे ःभारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत मनीषा नृत्यालय प्रस्तुत ' धरोहर -लिगसी ऑफ कथक ' हा नृत्य कार्यक्रम ' आयोजित करण्यात आला आहे . कार्यक्रम शनीवार, २८ मे २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे होणार आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.
यात कथक नृत्याच्या अनेक सुंदर रचना, एकल, युगल आणि समूह नर्तनातून सादर होणार आहेत.नृत्य गुरू पं. मनीषा साठे या देखील नृत्य प्रस्तुती करणार आहेत.त्यांच्या ज्येष्ठ शिष्या मंजिरी कारुळकर, मानसी गदो, पूर्वा शाह, तेजस्विनी साठे, गौरी स्वकुळ, ईशा काथवटे, अदिती कुलकर्णी, अदिती लेले, वल्लरी आपटे, मधुरा आफळे, मौशमी जाजू, कीर्ती कुरंडे आणि सर्वेश्वरी साठे या नृत्य कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
हा कार्यक्रम विनामूल्य आहे.‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १२२ वा कार्यक्रम आहे.