लाल महालातील नृत्य प्रकरणानंतर विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनाचे पत्र देऊन टोचले कान
या प्रकणात संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दिले पत्र..
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे दि.२१ : उन्हाळ्याच्या सुट्टी असल्याने नागरिक पुण्यात कुटुंबाना घेऊन पुणे दर्शनासाठी येत असतात. परंतु यात पुणे महानगरपालिकेने पर्यटकांसाठी लाल महाल बंद ठेवला आहे. असं असतांना दुसरीकडे याच लाल महालात रिल्स काढण्याच्या निमित्ताने चित्रपटातील तमाशाच्या गाण्यावर आधारीत रिल्सचे शुटिंगचे करण्यात आल्याचं समोर आलं आहे याबाबत विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेऊन प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
सध्या पुणे मनपा वर प्रशासक आहे त्यांनी लोकांना विश्वासात घेऊन काम केले पाहिजे स्वतःची मनमानी कारभार थांबवा अशा सूचना देखील डॉ.गोऱ्हे यांनी दिल्या आहे. हे प्रकरण लक्षात आल्याने याबाबत चर्चा होत आहे असे किती गैरप्रकार घडत असतील याचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने समिती करून या सारख्या पुण्यातील इतर वास्तूकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर यात दुर्लक्ष आणि कामचुकार करणाऱ्या वरिष्ठ, कनिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तर जे कोणी ठेकेदार आहेत त्यांचे कंत्राट रद्द करण्याची सूचना देखील डॉ.गोऱ्हे यांनी नगरविकास मंत्री श्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.