राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने वाढत्या महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात महागाईची देवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ' कमळाबाई ' ची आरती करण्यात आली..


प्रेस मीडिया लाईव्ह : 

जीलानी उर्फ मुन्ना शेख :

पुणे:  वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शनिपार चौक येथे श.हनुमानाची आरती करून महागाई कमी करण्याचे साकडे घालत आंदोलन करण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये झालेल्या आंदोलनात महागाईची देवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ' कमळाबाई ' ची आरती करण्यात आली.हे आंदोलन खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.


 या आंदोलना मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश आण्णा काकडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्री विशाल तांबे, निलेश निकम, नगरसेवक प्रदीप गायकवाड, प्रवक्ते प्रदीप देशमुख,महिला अध्यक्षा .मृणालिनी वाणी, युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे, कार्याध्यक्ष अजिंक्य पालकर , कसबा विधानसभा अध्यक्ष गणेश नलावडे, रुपाली ठोंबरे पाटील आदींसह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



या वेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की ,जनतेचा विचार न करता केवळ आपलेच निर्णय त्यांच्यावर लादणारे सरकार म्हणून मोदी सरकारचा नावलौकिक आहे. वेग -वेगळे कायदे असतील, नोटबंदी जी.एस.
टी लागू करणे, सरकारी कंपन्या - बँका विकणे,जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवणे असे अनेक निर्णय मोदी सरकारने या देशाला दिले आणि या निर्णयामुळे हा देश महागाईत होरपळत आहे.  गेल्या दोन दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलेंडर मध्ये तब्बल पन्नास रुपयांची वाढ,   जीवनावश्यक वस्तू असणाऱ्या प्रत्येक वस्तूचे दर वाढलेले आहेत पेट्रोल, डिझेल, सी.एन.जी, पी.एन.जी,घरगुती गॅस,व्यवसायिक गॅस, खाद्यतेल अश्या सर्वच वस्तूंच्या किमतीं मध्ये भरमसाठ वाढ होण्यास मोदी सरकारची धोरणे कारणीभूत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post