प्रेस मीडिया लाईव्ह :
जीलानी उर्फ मुन्ना शेख :
पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा मराठी अभिनेत्री केतकी चितळेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे तिच्यावर चहु बाजूनी जोरदार टिका होत आहे.तसेच शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे युवक शहर अध्यक्ष स्वप्नील नेटके यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे तिच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे.
केतकी चितळेंनी तिच्या फेसबुकवरून शरद पवार यांच्याबद्दल अगदी खालच्या पातळीवर टिका केली आहे. त्यात तिने तुका म्हणे पवारा, नको उडवू तोंडाचा फवारा, ऐँशी झाले आता उरक, वाट पहातो नरक, सगळे पडले उरले सुळे. सतरा वेळा लाळ गळे, समर्थांचे काढतो माप, ते तर तुझ्या बापाचेही बाप. ब्राम्हणांचा तुला मत्सर, कोण रे तु ? तु तर मच्धर, भरला तुझा पापघडा. गप नाही तर होईल राडा, खाऊन फुकटाचं घबाड, वाकड झालं तुझं थोबाड, याला ओरबाड त्याला ओरबाड, तू तर लबाडांचा लबाड, असं तिने म्हटलं आहे.केतकी चितळेंनी केलेली पोस्ट अत्यंत खालच्या दर्जाची असून तिच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. समाजात तेढ निर्माण करण्याचे कृत तसेच दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेषाची भावना निर्माण होईल अशा पद्धतीची पोस्ट केल्याने तिच्यावर कलम 505(2), 500, 501,153 ए नुसार कळवा पोलीस ठाण्यात गन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील यांनी देखील केतकी चितळ्याचा समाचार घेतला आहे. चि चि चवताळीस बाई तू महिला असली तरी छपरीच तु, संस्कार नसलेली केतकी, इतकीशी कशी चवताळीस हरामखोर विकृती, मनोरुग्ण तुला चपलेने 100 मारून 1 मोजले पाहीजे. कशात ना मशात केतकीबाई तमाशात , लवकरच जंगी चोपाची गरज आहे हिला ,मिळणारच बाई तुला चोप. असं रूपाली पाटील यांनी म्हटलं आहे.