सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कॅम्पस आहे की चित्रपट स्टुडिओ ..?

जाता जाता कुलगुरूंना हिरो बनण्याचा मोह आवरला नाही....

प्रेस मीडिया लाईव्ह :

जीलानी उर्फ मुन्ना शेख :

पुणे :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कॅम्पस आहे की चित्रपट स्टुडिओ आहे ..? असा प्रश्न सर्वानाच पडला आहे.  गेल्या काही दिवसांपासून विविध वेब सिरीज, चित्रपट, मालिका यांचे शूटिंग सातत्याने विद्यापीठ कॅम्पस मध्ये सुरू आहे. शैक्षणिक कामकाजाच्या दिवशी कोणत्याही चित्रपट शूटिंगला परवानगी देता येणार नाही असा नियम असताना सर्व नियम धाब्यावर बसवून विद्यापीठ प्रशासनाकडून सातत्याने शूटिंगला परवानगी दिली जात आहे. 

दुसरी गोष्ट म्हणजे 1२ मे 2022 रोजी विद्यापीठात पदवीदान समारंभ पार पडला  त्या दिवशी ही विद्यापीठात शूटिंगला परवानगी देण्यात आली होती . विद्यापीठ प्रशासन शूटिंगला परवानगी देण्यासाठी इतके मेहरबान का झाले आहे ? विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने 29 फेब्रुवारी 2008 रोजी चित्रीकरणाला परवानगी देण्याबाबत नियमावली निश्चित करून दिली आहे. त्यामध्ये शैक्षणिक कामकाजाच्या दिवशी शूटिंगला परवानगी देता येणार नाही असे स्पष्ट नमूद केले आहे तरी सुद्धा विद्यापीठात ‘बूट बेटल्स बेटरस’ या वेब सिरीजचे शूटिंग सुरू आहे. काही दिवसांपूर्वी सैफ अली खान, ऋतिक रोशन यांच्या चित्रपटांचे शूटिंग झाले. त्यापूर्वी एका ऐतिहासिक मालिकेचे शूटिंग विद्यापीठ कॅपम्समध्ये करण्यात आले आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या शूटिंगच्या सेटप्रकरणात कुलगुरूंनी भर सिनेट मध्ये दिलगिरी व्यक्त केली होती. तरीही मागचे पाढे पुन्हा सुरूच असल्याचे दिसून येत आहे.आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते विद्यानंद नायक यांनी विद्यापीठ कॅम्पसमध्ये नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या शूटिंगला विरोध दर्शविला आहे. कुलगुरूंकडून विशेषाधिकारात देण्यात येत असलेल्या या परवानगीची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. जाता जाता कुलगुरूंना हिरो बनण्याचा मोह आवरला नाही....

विद्यापीठाची गेल्या ७० वर्षातील ही पहिली व मोठी पीछेहाट ठरली आहे.

गेल्या पाच वर्षातील शैक्षणिक, संशोधनात्मक, प्रशासन या गोष्टींच्या अभावामुळे विद्यापीठाचे जागतिक स्तरावरील मानांकन ८० क्रमांकाने घसरल्यामुळे 'बेस्ट ॲक्टर इन निगेटिव्ह रोल' या भूमिकेची शिक्षण क्षेत्रात यापूर्वीची चर्चा झाली होती. याचा बहुधा विसर पडला असावा. विद्यापीठाची गेल्या ७० वर्षातील ही पहिली व मोठी पीछेहाट ठरली आहे.



Post a Comment

Previous Post Next Post