पुणे महानगरपालिका निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना जाहीर

येत्या काही दिवसात आरक्षण सोडत जाहीर होईल.” 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

जिलानी मुन्ना शेख :

 पुणे महानगरपालिका निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे. पुणे शहरातील किमान 32 प्रभागात सुधारणा करण्यात आल्याचा दावा महापालिकेच्या निवडणूक शाखेकडून करण्यात आला आहे. निवडणूक शाखा प्रमुख डॉ. यशवंत माने  म्हणाले, ”येत्या पालिकेच्या निवडणूका त्रि-सदस्यीय प्रभाग म्हणजेच 3 नगरसेवकांचा एक प्रभाग या पद्धतीने होणार आहे. त्यानुसार शहरामध्ये 58 प्रभागातून 173 नगरसेवक निवडून येणार आहेत. यातील 57 प्रभाग 3 नगरसेवकांचे तर एक प्रभाग 2 नगरसेवकांचा असेल. निवडणुकीसाठीचा प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा जाहीर झाला आहे. येत्या काही दिवसात आरक्षण सोडत जाहीर होईल.” 

दरम्यान, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणुका घ्याव्यात आणि 2 आठवड्यामध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. या आधी महानगरपालिकेने प्रारूप प्रभाग रचना आराखडा प्रसिद्ध करून त्यावरील हरकती सूचनांची कार्यवाही 10 मार्च रोजी पूर्ण केली होती. त्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला होता. त्याचे सादरीकरण आयुक्तांनी मागील मंगळवारी केले होते. त्याला निवडणूक आयोगाने मान्यता दिली. त्यानुसार अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post