प्रेस मीडिया लाईव्ह :
जीलानी उर्फ मुन्ना शेख :
कोंढवा खुर्द : कौसर बाग येथील राहत बाग कब्रस्तान च्या सीमा भिंतीचे तसेच अन्य विकास कामांचा शुभारंभ कार्यक्रम रविवार 29 मे 2022 रोजी सायंकाळी 5:00 वाजता संपन्न झाला. माननीय नवाब मलिक यांच्या अल्पसंख्यांक खात्याच्या विकास निधीतून, हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे पाटील यांच्या सहकार्यातून आणि माजी स्वीकृत नगरसेविका सौ. हसीना इनामदार यांच्या अथक प्रयत्नांतून 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. 25 लाख रुपये राहतबाग कब्रस्तान साठी आणि 25 लाख रुपये सय्यद नगर येथील कब्रस्तान साठी, या निधीतून विकास कामाचा शुभारंभ आमदार चेतन पाटील, सौ. हसीना इनामदार आणि फारुखभाई इनामदार यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
आमदार साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सौ. हसीना इनामदार यांच्या मागणीनुसार भविष्यात प्रभाग क्रमांक 42 मध्ये अत्याधुनिक शाळा व वैद्यकीय सेवेसाठी हॉस्पिटल निर्माण करण्यासाठी यथायोग्य सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत दादा जगताप, माजी स्टँडिंग कमिटी चेअरमन रशीद शेख, माजी नगरसेवक फारुखभाई इनामदार, माजी नगरसेवक एडवोकेट गफूर पठाण, माजी नगरसेविका नंदाताई लोणकर,माजी नगरसेवक रईस सुंडके, राहत बाकीचे ट्रस्टी शफी पठाण, युसुफ बागवान,कारी इद्रीस, इक्बाल शेख, एनसीपी पुणेचे सेक्रेटरी ऑफ ऑर्गनायझेशन मोहम्मदिन खान, मुस्लिम बँकेचे डायरेक्टर बबलू सय्यद, शाहीद भाई शेख, अनिस अंसारी, फराना ताज, डॉ. नसिन, मौलाना हाफिस अब्दुल समद आदी मान्यवर तसेच मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होते.