प्रेस मीडिया लाईव्ह
अन्वरअली शेख :
पुणे : जनसंघर्ष क्रांती मोर्चा , संघर्षनायक मिडिया व साशिभूषण हरिचंद्र कांबळे स्मुर्ती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने संघर्षनायक राष्ट्रीय गौरव पुरस्कार पुरस्कार 2022 प्रदान करण्यात आला त्या वेळी शहरातील वृत्तपत्रकार संस्थेचे संपादक व वरिष्ठ पत्रकार , समाजसेवक, अधिकारी मान्यवर यावेळी उपस्थित होते, प्रेस मीडिया लाइव डॉट कॉम पुणे चे संपादक मेहबूब सर्जेखान यांचा यावेळी सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
सुरवातीस आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत संघर्षनायक मिडियाचे मुख्य संपादक व अध्यक्ष स्वागताध्यक्ष संतोष आठवले यांनी करून कार्येक्रमाचे प्रस्ताविक केले. तर संघर्ष नायक मिडियाचे संपादक व कार्येक्रमाचे अध्यक्ष फिरोज मुल्ला (सर ) यांनी आपले विचार व्यक्त केले .
या कार्क्रमाचे प्रमुख ज्येष्ठ विचारवंत व युवक क्रांती दलचे संस्थापक मा. डॉ. कुमार सप्तर्षी होते. डॉ कुमार सप्तर्षी यांनी आपल्या मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की , आपल्या देशात सर्व धर्म आहेत ,आपला धर्म आपल्या घरात , रस्त्यावर आल्यावर आपण सर्व भारतीय आहोत.
संघर्षनायक मिडिया राष्ट्रीय गौरव पुरस्काराचे मानकरी अॅड . बस्तू रेगे व अॅड . पल्लवी रेगे प्रा . डॉ . शरद गायकवाड चेतनभाई इंगळे राष्ट्रीय अध्यक्ष पँथर आर्मी , वाशीम संतुलन संस्था , पुणे सत्यशोधक विचारवंत , सातारा बाळासाहेब लिंबाजी भडकवाड ज्येष्ठ साहित्यिक माडा सोलापूर अविनाश तुकाराम कांबळे डॉ . हसीना समीर शाह संस्थापक अध्यक्ष सुखाई प्रतिष्ठान हिम सोसायटी अध्यक्ष अमरावती शाहीर चरण भीमराव जाधव औरंगाबाद अनिता रवींद्र सावळे समाज सेविका , पुणे दिपक राजकुमार पंचमुख संस्थापक अध्यक्ष प्रबुद्ध फाउंडेशन , पुणे मल्लिकार्जुन बी . मुलगे दौंड पुणे जयपाल नामदेव कांबळे शिरोळ तालुका अध्यक्ष रि.पा.इ ( आठवले ) मनीष खर्चे पत्रकार अकोला , समीर विजापुरे तौफिक किल्लेदार कुणाल सोनवने साधू फुलमाळी आश्रफ खान , बेनी जोसेफ, सुनिता एकनाथ भोसले आ दिवासी पारधी समाज संघटना प्रामुख्याने उपस्थित होते.
संघनायक गौरव पुरस्काराचे मानकरी राहुल श्रीकांत कांबळे सामाजिक कार्यकर्ते , मुंबई हलीमा शेख अध्यक्षा स्वयंप्रेरणा विकास संस्था पुणे रमेश कांबळे अध्यक्ष माणुसकी फाउंडेशन , शिरोळ तालुका , रमेश मिठारी , कोल्हापूर संभाजी कांबळे ( पत्रकार ) राधानगरी कोल्हापूर मुख्य संयोजक फिरोज मुजावर संदीप शेंडगे वॉल्टर सलडाना आकाश दंडगुळे या सर्वांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शेवटी
सदरचा कार्येक्रम श्रमिक पत्रकार भवन , गांजवे चौक पुणे येथे आयोजित करण्यात आला . शेवटी संघर्षनायक मिडियाचे मुख्य संपादक व अध्यक्ष स्वागताध्यक्ष संतोष आठवले यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले.