एनिमेशन,व्हिज्युअल इफेक्ट्स,गेमिंग,कॉमिक्स क्षेत्रातील कलाकारांचा सन्मान .
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या पी. ए. इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स,डिझाईन अँड आर्टस् (वेदा) च्या वतीने एनिमेशन,व्हिज्युअल इफेक्ट्स,गेमिंग,कॉमिक्स क्षेत्रातील कलाकारांचा 'गोल्डन पिक्सेल अवॉर्ड्स ' देऊन सन्मान करण्यात आला. पुनर्युग आर्ट व्हिजन प्रा.लि. चे संस्थापक आशीष कुलकर्णी यांच्याहस्ते रविवारी सकाळी आझम कॅम्पस येथे झालेल्या कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला .
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पी. ए. इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स,डिझाईन अँड आर्टस् (वेदा) चे अधिष्ठाता डॉ. ऋषी आचार्य यांनी स्वागत केले .
आशीष कुलकर्णी म्हणाले,' एनिमेशन,व्हिज्युअल इफेक्ट्स,गेमिंग,कॉमिक्स क्षेत्रात कारकीर्द करण्यासाठी अनेक संधी असून विद्यार्थ्यांनी त्याकडे लक्ष केंद्रित करावे'. डॉ.पी. ए. इनामदार म्हणाले,'कलाकार,या क्षेत्रातील व्यवसायिक आणि इंडस्ट्रीने एकत्र येऊन शिक्षणक्षेत्र आणि उद्योग क्षेत्रात सेतू बांधावा . डॉ. ऋषी आचार्य म्हणाले ,'आर्ट इंडस्ट्रीमधील कलाकारांचा सत्कार करून त्यांच्या कला आणि गुणवत्तेचा सन्मान करणे हा या पुरस्कार सोहळ्याचा उद्देश होता' . या सोहळ्याचे हे दुसरे वर्ष होते .