प्रेस मीडिया लाईव्ह :
जिलानी उर्फ मुन्ना शेख :
पुणे : महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षित जागांचे प्रभाग बुधवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आले. एकूण 173 जागांपैकी अनुसूचित जातींसाठी 23, तर अनुसूचित जमातींसाठी 2 जागा राखीव आहेत.त्यासाठीची लोकसंख्यानिहाय याद्या आयोगाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे 25 प्रभाग राखीव असणार आहेत.
पालिका निवडणुकीसाठी आयोगाने पुणे शहराची 2011ची 35 लाख 56 हजार 824 इतकी लोकसंख्या गृहीत धरली असून, त्यात अनुसूचित जातींची लोकसंख्या 4 लाख 80 हजार 17 आहे. तर अनुसूचित जमाती लोकसंख्या 41 हजार 561 आहे. त्यानुसार लोकसंख्या गृहीत धरून हे आरक्षित प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत.
दरम्यान, 25 पैकी 13 जागा या महिलांसाठी राखीव असणार असून त्यात 12 जागा अनुसूचित जाती महिला, तर 1 जागा अनुसूचित जमाती महिलांसाठी असणार आहे. तर महिलांसाठीच्या आरक्षणाची सोडत स्वतंत्रपणे काढली जाणार आहे.
अनुसुचित जातीचे आरक्षित प्रभाग
प्रभाग क्र. २० - पुणे स्टेशन-मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड
एकूण लोकसंख्या : ६७ हजार १२९ -
अनुसुचित जाती लोकसंख्या :१९ हजार ५६२
प्रभाग क्र. ५०- सहकारनगर - तळजाई
एकूण लोकसंख्या : ६१ हजार २४४
अनुसुचित जाती लोकसंख्या : १६ हजार ३२
प्रभाग क्र. ४८ - अप्पर सुप्पर-इंदिरानगर
एकूण लोकसंख्या : ५६ हजार ८८४
अनुसुचित जाती लोकसंख्या : १४ हजार ६९१
प्रभाग क्र. ८ - कळस - फुलेनगर
एकूण लोकसंख्या : ६२ हजार २७३
अनुसुचित जाती लोकसंख्या :१५ हजार ५८३
प्रभाग क्र. २७ - कासेवाडी लोहियानगर
एकूण लोकसंख्या : ६८ हजार ५९१
अनुसुचित जाती लोकसंख्या : १६ हजार ६९
प्रभाग क्र. ९ - येरवडा
एकूण लोकसंख्या : ७१ हजार ३९०
अनुसुचित जाती लोकसंख्या : १६ हजार १३९
प्रभाग क्र.११ - बोपोडी-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
एकूण लोकसंख्या : ६२ हजार २६९
अनुसुचित जाती लोकसंख्या : १३ हजार ११५
प्रभाग क्र. ७ - कल्यानीनगर-नागपुरचाळ
एकूण लोकसंख्या : ६७ हजार ७३९
अनुसुचित जाती लोकसंख्या : १४ हजार १५४
प्रभाग क्र. ३७ - जनता वसाहत- दत्तवाडी
एकूण लोकसंख्या : ६९ हजार ६७२
अनुसुचित जाती लोकसंख्या : १४ हजार २०९
प्रभाग क्र- ३८- शिवदर्शन -पद्मावती
एकूण लोकसंख्या : ६४ हजार २२१
अनुसुचित जाती लोकसंख्या : १३ हजार ४३
प्रभाग क्र. १ - धानोरी-विश्रांतवाडी
एकूण लोकसंख्या : ५५ हजार ४८८
अनुसुचित जाती लोकसंख्या : १० हजार ९२७
प्रभाग क्र. ४२ - रामटेकडी-सय्यदनगर
एकूण लोकसंख्या : ४९ हजार २५
अनुसुचित जाती लोकसंख्या : ९ हजार ३७०
प्रभाग क्र. २६ - वानवडी गावठाण-वैदुवाडी
एकूण लोकसंख्या : ५९ हजार २०
अनुसुचित जाती लोकसंख्या : १० हजार ९९३
प्रभाग क्र. २२ - मांजरी बुद्रुक-शेवाळवाडी
एकूण लोकसंख्या : ६१ हजार ८७८
अनुसुचित जाती लोकसंख्या : ११ हजार ४९४
प्रभाग क्र. १०- शिवाजीनगर गावठाण- संगमवाडी
एकूण लोकसंख्या : ६२ हजार ४८१
अनुसुचित जाती लोकसंख्या : ११ हजार ४९४
प्रभाग क्र. ३९ - मार्केटयार्ड-महर्षीनगर
एकूण लोकसंख्या : ६० हजार ५३७
अनुसुचित जाती लोकसंख्या : १० हजार ८५४
प्रभाग क्र. २१ - कोरेगाव पार्क - मुंढवा
एकूण लोकसंख्या : ६७ हजार ५७४
अनुसुचित जाती लोकसंख्या ११ हजार ७६१
प्रभाग क्र.४७ कोंढवा बु.-येवलेवाडी
एकूण लोकसंख्या : ५४ हजार ४९२
अनुसुचित जाती लोकसंख्या : ९ हजार २०६
प्रभाग क्र. ४६ - मोहमंदवाडी-उरुळी देवाची
एकूण लोकसंख्या : ५२ हजार ७२०
अनुसुचित जाती लोकसंख्या : ८ हजार २६
प्रभाग क्र.१९ - छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम- रास्ता पेठ
एकूण लोकसंख्या : ५८ हजार ९९४
अनुसुचित जाती लोकसंख्या : ८ हजार ७८५
प्रभाग क्र.- ४ - पुर्व खराडी- वाघोली-
एकूण लोकसंख्या : ५८ हजार ९१२
अनुसुचित जाती लोकसंख्या : ८ हजार ५६४
प्रभाग क्र- १२ - औंध-बालेवाडी
एकूण लोकसंख्या : ६३ हजार ३६२
अनुसुचित जाती लोकसंख्या : ८ हजार ९९६
प्रभाग क्र. ३ - लोहगाव- विमाननगर -
एकूण लोकसंख्या : ६१ हजार ८३६
अनुसुचित जाती लोकसंख्या : ८ हजार ५९२
अनुसुचित जमाती आरक्षित प्रभाग
प्रभाग क्र.- १ - धानोरी- विश्रांतवाडी
एकूण लोकसंख्या : ५५ हजार ४८८
अनुसुचित जमाती लोकसंख्या : १ हजार ६५२
प्रभाग क्र. १४ - पाषाण - बावधान बुद्रुक
एकूण लोकसंख्या : ५७ हजार ९९५
अनुसुचित जमाती लोकसंख्या : १ हजार ६२८