मजहर भाई खान यांची राष्ट्रवादी कांग्रेस युवक उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्हापदी निवड



प्रेस मीडिया लाईव्ह

अन्वरअली शेख

पिंपरी चिंचवड दि 27. देहूरोड किवळे  मजहर भाई खान यांची राष्ट्रवादी  कांग्रेस युवक उपाध्यक्ष  पिंपरी चिंचवड शहर जिल्हा पदी निवड करण्यात आली असून त्यांना नियुक्ती  पत्र  राष्ट्रवादी युवक महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच पिंपरी चिंचवड चे प्रभारी पंडित गौतम आगा आणि राष्ट्रवादी युवक अध्यक्ष पिंपरी चिंचवड चे इम्रान भाई शेख यांच्या हस्ते देण्यात आले .

देहूरोड शहराच्या साईनगर किवळे प्रभाग क्रमांक 24 मधे मजहर खान यांचे निवासस्थान असल्यामुळे या प्रभागात ते नेहमी सामाजिक उपक्रम राबवण्यात पुढाकार घेतात, तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात,  युवक राष्ट्रवादी कांग्रेस उपाध्यक्ष  पिंपरी चिंचवड शहर जिल्हा पदी निवड झाल्याबद्दल त्यांना त्यांच्या मित्र परिवारातर्फे शुभेच्छा देण्यात येत आहेत.



प्रेस मीडिया लाईव्ह 

सह संपादक अन्वरअली शेख

Post a Comment

Previous Post Next Post