प्रेस मीडिया लाईव्ह :
अन्वरअली शेख :
पिंपरी : लॉलीपॉप इंटरटेनमेंट आणि कॅलिस्टा पिजंट यांच्या वतीने जागतिक मातृदिनानिमित्त पार पडलेल्या Calista India 2022 सौंदर्य स्पर्धेत महिला गटात अहमदनगरच्या सुवर्णा अमोल नाईकवाडी यांनी प्रथम पारितोषिक पटकावले तसेच युवती गटात पुणे येथील श्वेता शेळके यांनी प्रथम क्रमांक पटकावले द्वितीय क्रमांकाचा मान दिशा आंब्रे आणि तृतीय क्रमांक रेणुका राऊत यांना भेटला. विशेष पुरस्कारासाठी दीक्षा गायकवाड आणि सोनाली हिंगे यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून मेघा साळुंखे आणि संदीपा जाना यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर जे बंड्या यांनी केले .कार्यक्रमाची ग्रूमिंग पार्थ पवार आणि चंदना गुप्ता यांनी केली . स्पर्धकांची वेशभूषा आणि केशरचना एम सी के मेकओवर च्या मेघना पोखरकर काळे यांनी केली.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ आणि ह्युमन राईट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास बनसोडे तसेच अभिनेत्री संध्या पांडे हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता लॉलीपॉप इंटरटेनमेंट संचालक संजय जोगदंड यांनी केली .कार्यक्रमास माननीय नितीन साळुंके आणि राज जोगदंड यांनी विशेष आभार मानले. कार्यक्रमास शिल्पा मगरे गाडेकर शिल्पा साखरे, रेवती लोंढे, अंबिका पिटा, मोनिका जाधव , गत विजेत्या सरगम ससार , माधवी बोकील योगिता पवार ,विक्रम , मासूम युसुफ, अविनाश धोत्रे यांनी विशेष सहकार्य केले.