पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे प्रभारी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले..
प्रेस मीडिया लाईव्ह :
अनवर अली शेख :
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात नव्या पोलीस आयुक्तांनी पदभार घेतल्यानंतर आयुक्तांनी लगेचच दुसरा बदल केला आहे. पहिल्याच दिवशी सामाजिक सुरक्षा पथक बरखास्त केल्यानंतर आता स्थानिक पोलिसांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकून न घेतल्यास, नागरिकांच्या तक्रारीची दखल न घेतल्यास नागरिकांनी थेट पोलीस आयुक्तांना त्यांची तक्रार व्हाट्स ॲप करावी, असे आवाहन करत पोलीस आयुक्तांनी व्हाट्सअप नंबर जाहीर केला आहे.
अकुश शिंदे यांची 20 एप्रिल रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पदावर बदली झाली. त्यांनी तात्काळ पोलीस आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली. पहिल्याच दिवशी आयुक्त अंकुश शिंदे यांनी सामाजिक सुरक्षा पथक बरखास्त केले. त्यांनतर पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस ठाणे व गुन्हे शाखेच्या कामगिरीचा आढावा घेतला. आयुक्तांनी सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. यापुढे पोलीस ठाणे अथवा विविध शाखांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा मारल्यास संबंधित प्रमुखाला जबाबदार धरण्यात येईल, अशी तंबी दिली. आयुक्तांच्या या आदेशाने पिंपरी चिंचवड पोलीस दलात एकच खळबळ उडाली.