सर्वसामान्यांना मोठा धक्का सीएनजीच्या दरात वाढ
प्रेस मीडिया लाईव्ह :
नवी दिल्ली | मागील काही काळापासून महागाईत सातत्याने वाढच होत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असताना त्यांना रोज धक्क्यावर धक्के बसत आहेत.घरगुती वापराच्या व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यानंतर आता सीएनजी देखील महागलं आहे. सर्वसामान्यांना मोठा धक्का देत इंद्रप्रस्थ गॅसने दिल्लीत सीएनजीच्या दरात वाढ केली आहे. हे दर आजपासून लागू करण्यात आले आहेत.
दिल्लीसह गाझियाबाद, नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्येही सीएनजीच्या दरात 2 रूपयांनी वाढ झाली आहे. नव्या दरानुसार दिल्लीत प्रतिकिलो सीएनजीची किंमत 75.61 रूपये आहे. तर नोएडा, गुरूग्राम आणि गाझियाबादमध्ये प्रतिकिलो सीएनजीसाठी 83.94 रूपये मोजावे लागत आहेत.
दरम्यान, राजधानी दिल्लीत सहा दिवसात दोनदा सीएनजी महागलं आहे. तर महाराष्ट्रातील अनेक शहरात प्रतिकिलो सीएनजीसाठी 80 रूपये मोजावे लागत आहेत. पेट्रोल-डिझेलप्रमाणे सीएनजी देखील महागल्याने सर्वसामान्यांना वाहनं चालवणं कठिण झालं आहे.