इंधनाच्या दरात आजपासून कपात केल्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोलच्या दरात मोठी घट झाली

22 मे रोजी केंद्राकडून दर कपात करण्याची घोषणा करण्यात आली आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह :

 केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल डिझेलच्या दरात कपात केली असल्याची घोषणा केली आहे. पेट्रोल 9 रुपये तर डिझेल 7 रुपयांनी कमी केले आहे. यामुळे देशातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.इंधनाच्या दरात आजपासून कपात केल्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोलच्या दरात मोठी घट झाली आहे. गेल्या 45 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. यानंतर 22 मे रोजी केंद्राकडून दर कपात करण्याची घोषणा करण्यात आली आहे.


केंद्राच्या घोषणेनंतर दिल्लीत पेट्रोल 9.5 रुपयांनी तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त झाले आहे. दिल्लीत पेट्रोलचे दर प्रतिलिटर 105.41 रुपये होते तर आता 96.72 पर्यंत पोहोचले आहेत. त्याच वेळी, डिझेलची किंमत 89.62 रुपये प्रति लीटर झाली आहे, जी आधी 96.67 रुपये होती. मुंबईत उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर पेट्रोलचा एक लिटरचा दर 111.35 रुपयांवर तर डिझेलचा दर 97.28 रुपयांवर पोहोचला आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर 102.65 रुपये आणि 94.24 रुपये प्रति लिटर आहेत. तर कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत 106.03 रुपये आणि डिझेलची किंमत 92.76 रुपये आहे. बंगळुरूमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 101.94 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 87.89 रुपये झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post