ब्रेकिंग न्यूज : केतकी चितळे हीला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई :  शरद पवारांच्या विरोधात वादग्रस्त फेसबुक पोस्ट करणं केतकी चितळेला भोवलंय. केतकी चितळे हीला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठाणे कोर्टात  या प्रकरणी युक्तिवाद करण्यात आला. शनिवारी केतकी चितळे हिला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. विशेष म्हणजे यावेळी केतकी चितळे हीनं स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. तिच्या वतीनं कुणीही वकील कोर्टात युक्तिवाद करण्यासाठी नेमण्यात आलेला नव्हता. कोर्टात झालेल्या युक्तिवादानंतर आता 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावणी आली आहे. शरद पवार यांच्यावर वादग्रस्त फेसबुक पोस्ट लिहिल्यानंतर आता केतकी चितळेच्या अडचणी वाढल्या आहेत . केतकी चितळेवर कारवाई व्हावी, या अनुशंगानं सगळ्यात आधी कळव्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. अखेर तिच्या अडचणीत वाढ झाल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post