मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी उमेदवारांना विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या कार्यालयात दिल्या शुभेच्छा...
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई, ता. २६ : आज विधानभवन येथे विधान परिषद उपसभापती कार्यालयात मुख्यमंत्री ना. श्री. उद्धवजी ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासमवेत , खासदार संजय राऊत आणि संजय पवार यांना शुभेच्छा दिल्या.
निमित्त होतं राज्यसभेच्या निवडणुकीसाठी संजय राऊत आणि कोल्हापूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व उमेदवार संजय पवार यांचा अर्ज भरण्याचा. विधान भवन येथे आज मुख्यमंत्र्यांनी अचानकपणे उपसभापती कार्यालयाकडे मोर्चा वळवला आणि डॉ. नीलम ताईशी हास्य विनोद करीत सत्कार स्वीकारला.
यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार अनिल देसाई, खासदार संजय राऊत, विनायक राऊत,अरविंद सावंत, आमदार आणि प्रतोद सुनील प्रभू, उपसभापती कार्यालयाचे सचिव रविंद्र खेबुडकर, अविनाश रणखांब, डॉ. अर्चना पाटील, कोल्हापूरचे शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.