पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे देशात महागाईचा भोंगा वाजला

पेट्रोल-डिझेल आणि सीएनजी-पीएनजीच्या दरवाढी मुळे सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त ...


प्रेस मीडिया लाईव्ह :

  घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 190.50 ने वाढ झाली आहे त्याच बरोबर अनुदानही रद्द करण्यात आले आहे. पेट्रोल-डिझेल आणि सीएनजी-पीएनजीच्या दरवाढी मुळे सर्वसामान्य जनता महागाईने  त्रस्त झाली आहे.त्यातच पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे देशात महागाईचा भोंगा वाजला आहे. तेल कंपन्यांद्वारे घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरचा दरात शनिवारपासून सरसकट 50 रुपयांनी वाढ करण्यात आली. यामुळे मुंबई, दिल्ली या प्रमुख शहरांत 14.2 किलोच्या सिलिंडरसाठी 999.50 म्हणजेच जवळपास 1000 रुपये मोजावे लागणार आहेत.

या आधी 22 मार्च रोजी घरगुती घरगुती सिलिंडरच्या किमतीत प्रतिसिलिंडर 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर अनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 949.50 रुपयांवर पोहोचली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा 50 रुपयांची वाढ करण्यात आल्यामुळे आधीच इंधन दरवाढीमुळे त्रस्त असलेल्या जनतेला महागाईचा झटका बसला आहे.


गेल्या 8 वर्षांत गॅस सिलिंडर अडीच पटीने महागला

1 मार्च 2014 रोजी 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 410.5 रुपये होती जी आता प्रतिसिलिंडर 999.50 रुपये झाली आहे.

व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत अलीकडेच वाढ...

मे महिन्याच्या सुरुवातीला तेल कंपन्यांनी 1 मे रोजी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 102.50 रुपयांनी वाढविल्याने सिलिंडरची किंमत 2355.50 रुपयांवर पोहोचली. पाच किलो एलपीजी व्यावसायिक सिलिंडरची किंमत 655 रुपये करण्यात आली आहे. त्या आधी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 250 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर सिलिंडरची किंमत 2253 रुपयांवर गेली होती.


सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ...

गेल्या महिनाभरात सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईमध्ये सध्या सीएनजीचा दर 76 रु. प्रतिकिलो आहे. महानगर गॅस लिमिटेडने 29 एप्रिल रोजी मुंबई आणि आसपासच्या भागात सीएनजीच्या 4 रुपये प्रतिकिलोने वाढ केली होती. यानंतर मुंबईत सीएनजीचा दर 76 रुपये किलोवर गेला. 12 एप्रिल रोजी महाराष्ट्रात सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्याआधी 6 एप्रिल रोजीही वाढ झाली होती.
हॉटेलातील खाणे महाग झाले आहे. संभाजीनगर हॉटेल असोसिएशनने खाद्यपदार्थ दरात 20 टक्क्यांची वाढ केली आहे.

प्रमुख शहरांतील गॅस सिलिंडर दर

  • मुंबई 999.50 949.50
  • दिल्ली 999.50 940.50
  • कोलकाता 1,026 976.00
  • चंदिगड 1009 959.00
  • हैदराबाद 1052 1002

घरगुती गॅस सिलिंडरची किंमत गेल्या आठ वर्षांत अडीच पटीने वाढलेली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post