प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : दूध उत्पादकांच्या बळावर प्रतिदिन वीस लाख लिटर संकलनाचा संकल्प लवकरच पूर्ण करू, असा विश्वास गोकुळचे चेअरमन विश्वास नारायण पाटील यांनी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्ह्याची अर्थ वाहिनी असलेल्या गोकुळ दूध संघात सत्तांतराच्या वर्षपूतीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गोकुळच्या सत्तारुढ आघाडीचे नेते पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व सर्व संचालक उपस्थित होते.'
विश्वास पाटील म्हणाले, जिल्ह्याची आर्थिक सुबत्ता वाढविणाऱ्या आणि दूध उत्पादकांना स्वावलंबी बनविणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमधील सत्तांतरानंतरचे पहिले वर्ष हे संकल्पपूर्तीचे आणि सर्वच घटकांमध्ये संघाप्रती विश्वास वृद्धीगंत करणारे ठरले आहे.गेल्या वर्षी गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर नेते मंडळींनी चेअरमनपदाची धुरा माझ्याकडे सोपविली.
या माझ्या चेअरमनपदाच्या कारकिर्दीला आज एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षपूर्तीबद्दल वर्षभरात राबविलेल्या सभासदहिताच्या विविध योजना, प्रभावी कामकाज, संचालक मंडळाचा काटकसरीचा कारभार यासंबंधी मांडणी करणे गरजेचे आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व माझ्या सर्व सहकारी संचालक यांनी दिलेल्या बहुमोल सहकार्याने तसेच दूध उत्पादक, दूध संस्था, ग्राहक, कर्मचारी यांच्या योगदानाने 'गोकुळ' ची दिमाखात वाटचाल सुरु आहे याचा मला मनस्वी आनंद आहे. संघाची वार्षिक उलाढाल रू.२९२९ कोटी इतकी आहे. गतसालपेक्षा ३७८ कोटी वाढ झालेली आहे.
पाटील म्हणाले, वर्षभराच्या कालावधीत दूध उत्पाकांना दूध खरेदी दरात दोन वेळा वाढ करण्यात आली असून, भविष्यकालीन वेध घेत गोकुळ विस्तारासाठी भोकरपाडा खोपोली येथे बारा एकर जागा खरेदी प्रस्तावित आहे. मुंबई वाशी शाखा विस्तारीकरण, नवीन पेट्रोल पंपास मान्यता तसेच म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रम राबिवण्यात आला आहे. सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी मेडिकल ग्रेड ऑक्सीजन प्लॅन्ट सुरू केला असून भारतीय नौदल सेना (नेव्ही) कारवार यांना सिलेक्ट (यु.एच.टी) टेट्रापॅक दुधाचा पुरवठा केला जाणार आहे.ग्राहकांच्या मागणीनुसार गोकुळ बासुंदी हे नवीन उत्पादन चालू केले आहे. NDDB च्या सहकार्याने मॅन्युअर मॅनेजमेंट प्रोजेक्ट अंतर्गत, बायोगॅस प्लॉन्ट, व फिरती मिल्किंग मशीन सेवा कार्यान्वित करण्यात आली आहेत.