महापूर टाळण्यासाठी कर्नाटक राज्याशी समन्वय, प्रशासन सतर्क

 शिरोळ तालुका मान्सून पूर्व आढावा बैठकीत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे प्रतिपादन.

प्रेस मीडिया लाईव्ह :

जयसिंगपूर :तज्ञांकडून वर्तविण्यात येत असलेला चालू वर्षाच्या पावसाचा अंदाज पाहता धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, आणि जुलै ऑगस्ट महिन्यात  कमी कालावधी मध्ये जास्त मिलिमीटर पाऊस पडला तर महापुराचे संकट ओढवू शकते महापूर येऊ नये अशीच माझ्यासह सर्वांची भावना आहे, पण तो आलाच तर मात्र प्रशासनाच्या सहकार्याने सर्वांना सोबत घेऊन कर्नाटक सरकारशी समन्वय साधत महापूर कसा टाळता येईल याबाबतच्या संभाव्य उपाययोजना पूर्ण केल्या जातील, आणि संभाव्य महापूरला सर्वांनी धैर्याने सामोरे जाऊ असे उदगार सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी काढले शिरोळ तालुका प्रशासनाच्या वतीने मान्सून पूर्व आढावा बैठक जयसिंगपूर येथील सहकारमहर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहात सोमवारी संपन्न झाली यावेळी ते बोलत होते, कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ प्रमुख उपस्थित होते.

२०१९ ला महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर मागील तीन महापूरांचा अनुभव डोळ्यासमोर ठेवून कर्नाटक व महाराष्ट्र शासनाचे पाटबंधारे मंत्री दोन्ही राज्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्याशी समन्वय साधत वेळोवेळी बैठका घेत नियोजन केले, २०२० मध्ये ७२३ मिलिमीटर तर २०२१ ला ५०५ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद होऊन आपण महापूराला सामोरे गेलो, २०१९ पेक्षा २०२१ चा महापुर शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्यासाठी सर्वाधिक नुकसानीचा ठरला पण राज्य शासन म्हणून शक्य तितकी मदत शेतकरी आणि नुकसानग्रस्तांना करता आली,आज प्रशासनाच्या वेगवेगळ्या विभाग प्रमुखांनी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे मागील सर्व महापूरांचा अनुभव त्यांच्या पाठीशी असल्यामुळे त्यांनी या संकटाला सामोरे जाण्याची मोठी तयारी केली असल्याचे जाणवते मागील महापूरात विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यां पासून लाईनमन पर्यंत सर्वच घटकानी महापूर काळात केलेले काम सर्वोत्तम होते त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो असे सांगताना राज्यमंत्री यड्रावकर यांनी सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या योगदानाबद्दल त्यांचेही कौतुक केले, जनतेवर आलेल्या संकटाच्या प्रसंगी जबाबदारीने काम करणाऱ्यांचे कौतुक होईल पण जाणून-बुजून चूक करणाऱ्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही असेही त्यांनी सांगितले, कृषी विभागाने महापुरा पूर्वी पंचनाम्यासाठीचे नियोजन करावे तालुका प्रशासनाच्या प्रमुख म्हणून तहसीलदार अथवा प्रांताधिकारी यांनी आपल्या अध्यक्षतेखाली या दोन  तीन महिन्याच्या काळात प्रत्येक आठवड्याला बैठक घ्यावी आणि आढावा घ्यावा, एसटी महामंडळाने शक्य असेल त्या सर्व ठिकाणी आपल्या बसेस आणि त्या विभागातील कर्मचारी यांची नेमणूक करावी, आरोग्य विभागाने पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून विशेषता महिला वृद्ध व बाल रुग्णांबाबत आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. 


गावागावातील शाळांमधून पूरग्रस्तांसाठी निवारा उपलब्ध करून दिला जातो तेथे स्वच्छतेसाठी टॉयलेट ब्लॉक उभारावेत, कुरुंदवाड शहरात महापुराच्या काळात पार्किंग व्यवस्था अन्यत्र करावी, पोलिस दलाने पूर काळात भूरट्या चोरांचा बंदोबस्त करावा, पशुसंवर्धन विभागाकडे जिल्हाधिकारी यांनी ज्या भागात महापूर येत नाही तेथील अधिकाऱ्यांची नियुक्ती करून पशुसंवर्धन विभाग सक्षम करावा, ज्या रस्त्यांवर पाणी येते त्या रस्त्यांवरील पाण्याची खोली दर्शवणारे फलक बांधकाम विभागाने उभारावेत अशा सूचना आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी बैठकीत उपस्थित सर्व विभागाच्या प्रमुखांना दिल्या, कर्नाटक शासन नव्याने उभा करीत असलेल्या नदीवरील पुलांच्या भरावा बाबत कोल्हापूरचे पालकमंत्री बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री दोन्ही राज्यांचे प्रमुख मंत्री आणि लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांच्या सोबत लवकरच बैठकीचे आयोजन केले जाईल असेही राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले, महापूर काळात रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी केलेल्या कामाचे कौतुक करताना शासनाकडून या युवकांना किमान विमा संरक्षण देण्यासाठी आपण प्रयत्न करु आणि ते शक्य नसेल तर राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून या जवानांना विमा संरक्षण दिले जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी यावेळी विविध सूचना मांडल्या बैठकीत मांडलेला सूचनांचा प्रामुख्याने विचार केला जाईल असे राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले स्वागत व आभार तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी केले, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सर्व संकटांना सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे अशी ग्वाही दिली जिल्ह्यातील सर्व मंत्री लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे सर्व घटक यांच्या सोबत जिल्हा प्रशासन संकटाला सामोरे जाण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले, बैठकीस गट विकास अधिकारी शंकर कवितके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पाखरे, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री वैजणे, श्री.महामुनी, सांगली पाटबंधारे विभागाचे मोहन गळंगे, बांधकाम विभागाचे श्री बागवान, पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर रोहित रानभरे, तालुका कृषी अधिकारी श्री भोसले, महावितरणचे कार्यकारी अभियंता वैभव गोंदील, तालुका शिक्षणाधिकारी श्री कामत, कुरुंदवाड चे मुख्याधिकारी निखिल जाधव जयसिंगपूर चे मुख्याधिकारी तैमुर  मुलानी, यांच्यासह प्रशासनातील विविध विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post