मुकादमचा कृपेने हे कर्मचारी सकाळी १० वाजता आपल्या भागातून गायब असतात .
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : आनंदा शिंदे
इचलकरंजी वार्ड नं २१ मध्ये जवाहरनगर समोरून बाजारातून जो रस्ता जातो त्या रस्त्या मधून गटर गेले आहे.रस्त्यामध्ये मोठ्या नळ टाकला आहे , त्या नळा मध्ये मातीचा ढिगारा साचलेला असून नगरपालिकाचे कर्मचारी यांना साचलेल्या माती बद्दल दाखवून दिलेले असताना देखील दुर्लक्ष केले गेले आहे.गुरूवार पासून पडलेल्या पावसामुळे या रस्त्यावर पाणी साठून नाला तयार झाला होता.
इचलकरंजी नगरपालिकाचे पाणी पुरवठाचे कर्मचारी यांनी काही दिवसांपूर्वी वॉलची दुरुस्ती केली आहे परंतु वॉल दुरुस्ती केल्या नंतर जो वॉलचा बाजूचा मुरुम टाकून मुजवावा लागतो तो मुजवण्यात आलेला नाही. या भागातील नागरिकांनी वॉल दुरुस्ती काम झाल्यावर खड्डा व्यवस्थितपणे भरून घ्या अशी सूचना देखील दिली होती , पण त्या कडे सुद्धा दुर्लक्ष करण्यात आले . सफाई कर्मचारी यांच्या भोंगळ कारभारामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत
अशा लोकांना नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी कडक शासन केले पाहिजे मे महिन्यातच पाऊस चालू झाल्यामुळे ही परिस्थिती आहे मग जून महिन्यात काय असेल याचा विचार नगरपालिकेचे भागातील मुकादम ने यांचा विचार केला पाहिजे . सफाई कामगार यांची काम करण्याची वेळ सकाळी ठिक ६ ते दुपारी १ वाजेपर्यंत असताना मुकादमचा कृपेने हे कर्मचारी सकाळी १० वाजता आपल्या भागातून गायब असतात . मुख्यअधिकाऱ्यांनी या बाबत लक्ष देण्याची गरज आहे.