इचलकरंजी लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी महेंद्र बालर यांची निवड

 चिवपदी सुभाष तोष्णीवाल ,खजिनदारपदी संदीप सुतार..

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी / प्रतिनिधी

  इचलकरंजी शहर परिसरात सामाजिक , आरोग्य , शैक्षणिक व इतर क्षेत्रात कार्यरत असलेल्या इचलकरंजी लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी महेंद्र बालर यांची तसेच सचिवपदी सुभाष तोष्णीवाल ,खजिनदारपदी संदीप सुतार  यांची निवड करण्यात आली.तर क्लब ॲडमिनीस्ट्रेटर म्हणून पी. एम.जे. एफ. विजयकुमार राठी हे काम पाहणार आहेत. 

इचलकरंजी लायन्स क्लबच्या माध्यमातून सातत्याने रक्तदान , आरोग्य तपासणी शिबिर याचबरोबर विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येतात.याशिवाय शैक्षणिक , सांस्कृतिक कला क्षेत्रात या क्लबने आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे.त्यामुळे या क्लबचे समाज विकासात मोठे योगदान राहिले आहे.अशा इचलकरंजी लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी महेंद्र बालर यांची तसेच सचिवपदी सुभाष तोष्णीवाल ,खजिनदारपदी संदीप सुतार  यांची निवड करण्यात आली.तर क्लब ॲडमिनीस्ट्रेटर म्हणून पी. एम.जे. एफ. विजयकुमार राठी हे काम पाहणार आहेत. लक्ष्मीकांत भट्टड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या क्लबच्या बैैठकीत 

निवड कमिटी चेअरमन गजानन होगाडे यांनी सदर सदस्यांची नावे जाहीर केली. त्यास सर्व सदस्यांनी मान्यता दिली. सदर बैठकीला लायन्स क्लबचे अध्यक्ष लक्ष्मीकांत  भट्टड, झोन चेअरमन महेश सारडा, पी. एम.जे. एफ. विजयकुमार राठी, एम.जे. एफ. डॉ. विलासभाई शहा, विजयराज जाजू, भरत भंडारी, लिंगराज कित्तुरे, सुरेश पाटील, कृष्णा भराडिया, मनोज सोमाणी, सौ. कनकश्री भट्टड, सौ.स्वाती राठी, सौ.महादेवी कित्तुरे व अन्य लायन सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post