शाहु महोत्सव या कार्यक्रमात इचलकरंजी नगरपालिकेने सहभाग घ्यावा , इचलकरंजी नगरपालिका तर्फे शाहु कलादालन बांधावे

 इचलकरंजी-कोल्हापुर रोड ला शाहु जनपथ असे नामकरण करावे....


प्रेस मीडिया लाईव्ह :

हातकणंगले तालुका प्रतिनिधी श्रीकांत कांबळे 

इचलकरंजी.ता.हातकणंगले*येथे गेल्या ८ वर्षा पासून सात दिवसाचा भव्य दिव्य अश्या शाहु महोत्सवाचे आयोजन केले जाते.या मध्ये नृत्य,गायन, अभिनय,व्याख्यान, ऐतिहासिक प्रदर्शन,पुरस्कार सोहळे आदि कार्यक्रम घेतले जातात. काही वर्षा पासून या महोत्सवामध्ये इचलकरंजी नगरपालिका सुद्धा सहभाग घेत असल्याने त्याला अधिक प्रमाणात व्यापकता आलेली आहे. यावर्षी हि  इचलकरंजी नगरपालिकाने सहभाग घ्यावा व इतर मागण्याचे निवेदन शाहु महोत्सव गौरव २०२२ यांच्या वतीने आज मुख्याधिकारी डॉ प्रदीप ठेंगल यांना देण्यात आले.

सध्याचे वर्ष हे शाहु स्मृति शताब्दी वर्ष म्हणून आपण साजरा करीत आहोत. या वर्षी लोकराजाला एक आगळीवेगळी मानवंदना द्यावी यासाठी इचलकरंजी नगरपालिका तर्फे शाहु कलादालन बांधावे असे निवेदनात म्हटले आहे. हे कलादालन ३०० प्रेक्षकांचे असावे.यामधे शाहु महाराज यांच्या आयुष्यातील ऐतिहासिक क्षण दर्शवणारे तैलचित्र,शिल्प, डिजिटल माहितीपट, ग्रंथालय,प्रदर्शन हॉल, अत्याधुनिक लाईट सिस्टीम, साउंड सिस्टीम आदि सोईसुविधा असावेत असेही यावेळी शाहु महोत्सवचे संस्थापक अध्यक्ष आरुण रंजना कांबळे यांनी मुख्याधिकारी यांना विनंती केली .*


तसेच इचलकरंजी-कोल्हापुर रोड वर भव्य असा शाहु महाराज यांचा पुतळा आहे त्या रोडला शाहु जनपथ असे नामकरण करावे.आशा प्रकारचे निवेदन शाहु महोत्सव गौरव २०२२ तर्फे  मुख्याधिकारी यांना देण्यात आले.

यावेळी मुख्याधिकारी यांनी शाहु महोत्सव मधे इचलकरंजी नगरपालिका सहभाग होईल तसेच इतर मागण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल असे सांगितले.*

यावेळी शाहु महोत्सवाचे संकल्पक-प्रमुख अरुण रंजना कांबळे, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार साहेब, माजी नगरसेवक भाऊसो आवळेसाहेब,माजी आरोग्य सभापति संजय केंगार साहेब, माजी पाणीपुरवठा सभापति दीपक सुर्वेसाहेब,माजी नगरसेवक जहाँगीर पटेकरीसाहेब,शहाजी भोसलेसाहेब आदि मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post