हर्षवर्धन पाटील याचा यशाबद्दल सत्कार

 विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी गावभाग परिसरातील हर्षवर्धन उमेश पाटील याने दिल्लीतील ८ व्या नॅशनल टैंग सु डु चॅम्पियनशिप स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याचे नेतृत्व करत सुवर्णपदक पटकावल्याबद्दल वीरशैव उत्कर्ष मंडळाच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.

हा कार्यक्रम वीरशैव उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष गजानन सुलतानपूरे ,उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील ,संग्राम स्वामी, रुद्रभूमीचे स्वामी दयानंद स्वामी ,यड्रावचे ग्रा.पं सदस्य , पञकार बाबासाहेब राजमाने यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत रुद्र भूमी कमिटीचे उपाध्यक्ष सुनील चिंगळे यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक  बाळासाहेब देवनाळ यांनी केले. सर्व मान्यवरांचा सत्कार उमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी गजानन सुलतानपूरे , उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी दिल्लीतील ८ व्या नॅशनल टैंग सु डु चॅम्पियनशिप स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याचे नेतृत्व करत सुवर्णपदक पटकावल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांचे अभिनंदन करत त्याला भविष्यात सर्वोतोपरी सहकार्य राहिल ,अशी ग्वाही दिली.यानंतर दयानंद स्वामी यांनी आशीर्वचन देऊन मनोगत व्यक्त केेले.

या कार्यक्रमास शिवबसू खोत, विजय हावळे, शिवगोंड पाटील , तोडकर मामा, सुरेश जमदाडे, रमेश नायकवडी , सुनील चिंगळे, सचिन मडिवाळ, लंबे, बणगार समाजाचे अध्यक्ष इराण्णा चचडी, इराण्णा मट्टीकल्ली, शिवकुमार मुरतले , दीपक हिंगमिरे, श्री.मजगे सर ,प्रशिक्षक मनोज सातपुते ,रुद्र भूमी कमिटीचे सर्व पदाधिकारी, वीरशैव उत्कर्ष मंडळाचे पदाधिकारी व समाजातील इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post