प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड, माणगाव, कोरोची तसेच सांगली आणि पुणे जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंदीचा ठराव केला आहे. महाराष्ट्र शासनानेही सर्व गावांमध्ये असे ठराव व्हावेत अशा सूचना नुकत्याच निर्गमित केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संविधान संवादक तथा सेवादल कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतींनी अशा प्रकारचा ठराव करावा आणि आपले गाव समतेच्या व महिलांना सन्मानाने जगण्याच्या पातळीवर आणण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा पार करावा, असे संविधान संवादकांनीआग्रहाचे आवाहन करत रुई आणि तिळवणी ग्रामपंचायतीला पत्रे सादर केली.
देशाच्या स्वातंत्र्यानंतर भारतीयांनी संविधान निर्माण केले. त्यामध्ये प्रत्येक नागरिकास समतेचा हक्क मिळवून दिला. त्यानुसार कोणीही व्यक्ती इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा कमी दर्जाची नाही. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणणाऱ्या प्रथा परंपरांचा त्याग करणे हे नागरिकांचे कर्तव्य म्हणून आपण स्वीकारले आहे.असे असतानाही स्त्री जेंव्हा विधवा होते तेंव्हा तिला अनेक सामाजिक, धार्मिक अशा कार्यक्रमामध्ये दुय्यम मानले जाते. हे तिचा सन्मान कमी करणारे, तिला अपमानित करणारे कृत्य आहे. या प्रथेचे समाजातून उच्चाटन झाले पाहिजे. कोणत्याही स्त्रीला इतर स्त्री किंवा पुरुषाइतके सन्मानाने जगता आले पाहिजे. याविषयी कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड, माणगाव, कारोची तसेच सांगली आणि पुणे जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंदीचा ठराव केला आहे. महाराष्ट्र शासनानेही सर्व गावांमध्ये असे ठराव व्हावेत अशा सूचना नुकत्याच निर्गमित केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संविधान संवादक तथा सेवादल कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतींनी अशा प्रकारचा ठराव करावा आणि आपले गाव समतेच्या व महिलांना सन्मानाने जगण्याच्या पातळीवर आणण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा पार करावा असे आग्रहाचे आवाहन करत रुई आणि तिळवणी ग्रामपंचायतीला पत्रे सादर केली. तसेच यदुनाथ थत्ते यांचे 'आपला मान आपला अभिमान' हे संविधानावर भाष्य करणारे पुस्तक भेट दिले.यासाठी संघटक रोहित दळवी, युवा संघटन प्रमुख स्नेहल माळी आणि संविधान संवादक अमोल पाटील यांनी पुढाकार घेतला.