तातडीने कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा..
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी / प्रतिनिधी
पेट्रोल सह डिझेल व गॅस सिलिंडरमध्ये दरवाढ करुन महागाईस जबाबदार असणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारच्या निषेधार्थ इचलकरंजी येथे आज भाकपच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.यावेळी शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन प्रांत कार्यालयात शिरस्तेदार संजय काटकर यांच्याकडे सादर करत महागाई कमी करण्यासाठी तातडीने कार्यवाही व्हावी ,अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
केंद्रातील मोदी सरकारने नोटा बंदी ,जीएसटी , कामगार विरोधी कायदे करत सर्वसामान्य जनतेला कच्चे दिनाऐवजी वाईट दिवस आणले आहेत.त्यातच रशिया - युक्रेन युध्दाचे कारण सांगून तेल ,कडधान्य व जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करुन त्यातून जनतेची आर्थिक लुबाडणूक सुरु ठेवली आहे.आतातर पेट्रोल - डिझेलसह अत्यावश्यक घरगुती गॅस सिलिंडरच्या दरामध्ये भरमसाठ वाढ करत मोदी सरकारने चुकीचे धोरण अवलंबण्याचा सपाटा लावला आहे.यापूर्वी गॅस सिलिंडरवर मिळणारी सबसिडी देखील बंद करत सर्वसामान्य जनतेवर अन्यायाची कु-हाड चालवली असल्याचा आरोप माकप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.याच अनुषंगाने पेट्रोलसह डिझेल व गॅस सिलिंडरमध्ये दरवाढ करुन महागाईस जबाबदार असणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारच्या निषेधार्थ इचलकरंजी येथे आज भाकपच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.तसेच जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करणा-या व्यापा-यांच्या गोडावूनवर छापे टाकून कायदेशीर करावी , महागाई नियंत्रणात आणण्याबरोबरच पेट्रोल - डिझेल व गॅस सिलिंडरचे दर कमी करावेत , प्रलंबित घरकुलांची प्रश्न मार्गी लागावा यासह विविध मागण्या करत यासंदर्भात निवेदन
शिरस्तेदार संजय काटकर यांच्याकडे सादर केले.तसेच यासंदर्भात तातडीने कार्यवाही करुन सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा , अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
या आंदोलनात भाकपचे ज्येष्ठ नेते हणमंत लोहार , दादासाहेब जगदाळे ,महेश लोहार ,मंगल तावरे ,वर्षा जाधव ,दादू मगदूम ,विष्णू चव्हाण , मुमताज मुल्ला ,हुसेनबी रोन्याळ ,इस्माईल चिक्कोडे ,सुभाष झाळे ,रविंद्र सुतार , मुमताज शिरढोणे ,चंद्रकांत खामकर , रेणुका जक्का यांच्यासह पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले होते.