प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : प्रशासनाच्या तांत्रिक चुकांमुळे शासनाकडून आलेला महापुराचा निधी परत गेला आहे. परिणामी अद्याप हजारो पूरग्रस्त कुटूंबे शासनाच्या मदतीपासून वंचित राहिली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रमोद बचाटे यांनी पञकार बैठकीत केला.तसेच नुकसानग्रस्त पूरग्रस्तांना येत्यापंधरा दिवसामध्ये मदत मिळावी. तसेच संभाव्य पुर परिस्थिती बाबत ठोस उपाय योजनाकराव्यात अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही दिला.
या वेळी पूराची कारणे व उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. इचलकरंजी शहरात येणारी पुर परिस्थिती ही नैसर्गिक की कृत्रिम या विषयावर आज शनिवारी पूरग्रस्तानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सामाजिक कार्यकर्ते उल्हास लेले यांनी रस्त्यामधील भरावामुळे पुराचे पाणी नागरी वस्तीमध्ये येण्याचे प्रमाण वाढल्याचे सांगितले. तर कौशिक मराठे यांनी धरणातून पाण्याचा विसर्ग योग्य पद्धतीने केला तर नक्कीच पूरपरिस्थिती रोखू शकतो ,असे सांगत धरणातून विसर्ग होणार्या पाण्याची आकडेवारी सादर करीत हा प्रभावी उपाय असल्याचे पटवून सांगितले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद बचाटे यांनी २०२१ च्या महापूराची भिती अद्याप कमी झालेली नाही. त्यातच यंदाही पावसाचे प्रमाण सरासरी १०० टक्के असल्याने नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. २०२१ मध्ये पूरग्रस्तांना मदत करण्यास विलंब तर झालाच यशिवाय जीमदत जाहीर झाली त्यापासून अनेक कुटुंबे, व्यावसायिक अद्यापही वंचित आहेत. त्यांना जलदमदत मिळावी अन्यथा वेळप्रसंगी जन आंदोलन करण्यासाठीरस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिला. यावेळी संजय कुलकर्णी, महावीर कोल्हापुरे ,विजय चव्हाण ,किशोर माळी ,डी.पी.हंकारे ,दत्ता काळेआदींसह पुरग्रस्त बांधव उपस्थित होते.