व्यंकटेशच्या विद्यार्थ्यांची प्रबोधिनिला भेट



प्रेस मीडिया लाईव्ह :

 इचलकरंजी येथील व्यंकटेश महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी समाजवादी प्रबोधिनी आणि प्रबोधन वाचनालयाला संस्थाभेट उपक्रमंतर्गत भेट दिली. यावेळी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी सर्वांचे पुस्तकभेट देऊन स्वागत केले.तसेच समाजवादी प्रबोधिनीच्या पंचेवर्षाच्या वाटचालीची तसेच तीस हजार ग्रंथानी युक्त प्रबोधन वाचनालय, गेली तेहेतीस वर्ष सुरू असणारे प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिक यासह सतत चालणाऱ्या ठळक उपक्रमांची माहिती दिली. 

विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी प्रश्नोत्तराच्या रूपाने संवाद साधला. प्राचार्य डॉ.व्ही.ए.माने  यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.डॉ. डी. एस. कांबळे आणि प्रा.एम.पी.केसरकर यांनी विद्यार्थ्यांसह ही संस्थाभेट दिली. यावेळी राहुल पाटील, प्रसाद बडवे, तेजस नलवडे ,गजानन काळे, अशोक खोत, पंकज चौगुले, तन्मय कुलकर्णी, प्रज्योत शेटाने ,तेजस्विनी चव्हाण, अशियाना जमादार ,कोमल पारसे ,सलोनी खामकर, श्वेता रावळ ,साक्षी बडे, स्वरुपा मोहिते, प्रिया डोणवाडे, तोहिद माणगावे, शिवतेज पाटील, सुलतान सावळगी आदी  विद्यार्थी उपस्थित होते.प्रा.डॉ.डी.एस.कांबळे यांनी आभार मानले.

1 Comments

  1. एका पुरोगामी विचार घेऊन, रचनात्मक कार्य करणाऱ्या संस्थेस भेट ...छान उपक्रम.सर्व कॉलेज विद्यार्थी नी प्राध्यापकांचे अभिनंदन....

    ReplyDelete
Previous Post Next Post