प्रेस मीडिया लाईव्ह :
धुळे शहरासाठी पाणी पुरवठा होत असलेल्या सर्वच जलस्रोतांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असताना धुळे महानगरपालिकेच्या व सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे धुळे शहरात भीषण पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज हंडा आंदोलन केले.
धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा निरीक्षक अर्जुन टिळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपा व धुळे महापालिक विरोधात हंडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
धुळे