काँग्रेस पार्टीचा देश वासियांना संदेस.... काँग्रेस नगरसेवक अविनाश बागवे.
प्रेस मीडिया लाईव्ह :
जिलानी उर्फ मुन्ना शेख :
पुणे : पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे आज न्यू नाना पेठ , पुनम पॅलेस, पेस्टनजी हॉस्पीटल जवळ रोजा इफ्तारीचा कार्येक्रम संपन्न झाला.
या वेळी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे म्हणाले की आपल्या देशाची सामाजिक सलोखा बिघडला नसला पाहिजे तसेच आजच्या या इफ्तार कार्येक्रमास सर्वच पक्षांचे प्रतिनिधी व पोलीस उपस्थित आहेत . तसेच स्थानिक नगरसेवक प्रदीप गायकवाड म्हणाले की सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये जातीय सलोखा कायम रहावा या साठी उस्मान तांबोळी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्येमातून जातीय सलोखा कायम रहावा यासाठी ते कार्येक्रम घेत असतात याची सद्यस्थिती मध्ये महाराष्ट्र व देशासाठी याची नितांत गरज आहे . माध्येमातून या कार्यक्रमास समर्थ पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ताम्हाणे साहेब , समर्थ पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक एस एन हळे साहेब , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक प्रदीप गायकवाड , समाजसेवक जयंत किराड( शिक्षण प्रसारक मंडळी) ,मो. गौस शेर अहमद ( बबलू भाई ) संचालक मुस्लिम बँक ) समाज सेवक अहमद सय्यद , सिराज बागवान , अन्सार पिंजारी , अजहर उस्मान तांबोळी , अरशंद उस्मान तांबोळी , काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे. उपस्थित होते. या कार्येक्रमाचे आयोजन उस्मान तांबोळी यांनी केले व सर्व उपस्थितांचे आभार उस्मान तांबोळी यांनी मानले.