प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे – शहरात बलात्कारांच्या बातम्या अनेक वेळा बघायला मिळत आहे. त्यामुळे शहरात पोलिसांचा धाक राहीला की नाही असा प्रश्न सर्वानाच पडला आहे.
फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून सुरुवातीला आरोपी पोलीसांने महिलेबरोबर मैत्री केली त्यानंतर महिलेवर बलात्कार केला व तिचे नग्न फोटो व व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. विक्रम फडतरे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो पुण्यातील वाहतूक शाखेत कार्यरत आहे. याप्रकरणी एका 30 वर्षीय महिला इंजिनिअरने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार मोशी व आकुर्डीसह वेगवेगळ्या ठिकाणी 15 सप्टेंबर 2021 ते 11 फेब्रुवारी 2022 दरम्यान घडला आहे.
फडतरे यांने सुरवातीला तक्रारदार महिलेला फेसबुकद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. ही महिला विवाहित असून त्या एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत. त्यानंतर फडतरे व महिलेमध्ये मैत्री झाली व हे दोघे एकमेकांना भेटू लागले. या दरम्यान फडतरे याने महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. महिलेच्या नकळत त्याने तिचे नग्न फोटो व व्हिडिओ काढले. हे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. शेवटी या सर्व प्रकाराला कंटाळून महिलेने पोलीसात धाव घेतली. पुढील तपास पोलीस करत आहेत.