महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष आम. नाना पटोले यांची ग्वाही
प्रेस मीडिया लाईव्ह :
शिरोळ /प्रतिनिधी :
श्री दत्त कारखान्याच्यावतीने व उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले क्षारपड जमीन सुधारणा योजनेचे काम खूप मोठे असून आम्हाला या कार्याचा अभिमान वाटतो आहे. त्यांच्या या कामाकरिता तसेच स्व. सा. रे. पाटील यांचा वारसा जपणाऱ्या गणपतराव पाटील यांच्या सोबत मी नेहमीच असेन. सर्व शेतकऱ्यांना क्षारपड जमीन सुधारणाकामी मदत मिळवून देण्याकरिता स्वत: पुढाकार घेऊन मी मविआ सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करेन, अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष आम. नाना पटोले यांनी दिली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष आम. नाना पटोले यांनी आज श्री दत्त कारखाना कार्यस्थळी सदिच्छा भेट दिली. दत्त उद्योग समूहाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रोजेक्टरच्या सहाय्याने क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पाची माहिती सादर करण्यात आली. मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेग्गाण्णा यांनी ही माहिती विस्तृतपणे दिली. गणपतराव पाटील यावेळी बोलताना म्हणाले, शिरोळ तालुक्यातील २५ हजार एकर जमीन क्षारपड झाली असून दत्तच्या माध्यमातून ७ हजार एकरावर क्षारपड मुक्तीचा प्रकल्प यशस्वी झाला आहे. यापैकी २५०० एकरावर प्रत्यक्षात ऊस, सोयाबीन, वरणा, कलिंगड यासारखी पिके घेतली जात आहेत. कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांना पाने, पाणी आणि माती परीक्षण मोफत करून देण्यात येत असून सेंद्रिय कर्ब वाढीचे मोठे प्रयत्न होत आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांना होऊन १७० टनापर्यंत मजल गेली आहे. २०० टनाचे उद्दिष्ट ठेऊन कारखान्याच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. महापूर बुडीत क्षेत्रामध्ये शुगर बीट लागवडीचा पर्यायही यशस्वी ठरला असून पुढील हंगामात १०० एकरावर हा प्रयोग राबविण्यात येणार आहे.
घालवाड येथील क्षारपड सुधारणा प्रकल्पास भेट देत आम. नाना पटोले म्हणाले, हा प्रकल्प शेतकऱ्याना जीवनदायी ठरत आहे. हा प्रकल्प पाहून सरकारच्या वतीने मदत करण्याकरिता मी निश्चित प्रयत्न करेन. गणपतराव पाटील यांची शेतकऱ्यांप्रती तळमळ पाहून मला आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांची आठवण झाली. त्यांच्या कार्याला पुढे नेण्याचे काम गणपतराव अतिशय चांगल्या प्रकारे करीत आहेत. लवकरच या प्रकल्पा संबंधी मुंबई येथे गणपतराव पाटील यांच्या समवेत एक बैठक आयोजित करून शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मदत करता येईल याचा विचार केला जाईल. यावेळी शेतकऱ्यांशी त्यांनी विविध शेती प्रश्नावर चर्चा केली. क्षारपडमुक्तीचा अनुभव शेतकऱ्यांनी कथन केला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेल काँग्रेस कमिटी अध्यक्ष भानुदास माळी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी नंदकुमार कुंभार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे, शिरोळ तालुका काँग्रेस अध्यक्ष सर्जेराव शिंदे, शिरोळ तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा मिनाज जमादार, शिरोळ तालुका काँग्रेस समन्वयक शेखर पाटील, दत्तचे संचालक इंद्रजीत पाटील, दरगू गावडे, प्रमोद पाटील, संजय पाटील, भैय्यासाहेब पाटील, विजय सूर्यवंशी, विश्वनाथ माने, महेंद्र बागे, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, सचिव अशोक शिंदे, अशोकराव कोळेकर, मुसा डांगे, चंगेजखान पठाण, युनूस डांगे, भांडारचे चेअरमन दामोदर सुतार, शिरोळ तालुका काँग्रेस उपाध्यक्ष अनंत धनवडे, किर्तीवर्धन मरजे, सुदर्शन तकडे, माजी नगरसेवक विठ्ठल पाटील, माजी नगरसेवक नितीन बागे, शिरोळ तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष वासिम जमादार, अमोल चौगुले, सतपाल खोंद्रे, जयदीप थोरात, गुरु धनवडे, गुरुदास देसाई, युनूस जमादार, मानसिंग टिटवे, शक्तीजीत गुरव यांच्यासह कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.