स्व. माजी आमदार डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री दत्त साखर-शिरोळच्यावतीने विनम्र अभिवादन


प्रेस मीडिया लाईव्ह :

शिरोळ/ प्रतिनिधी:

कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे शिल्पकार, शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी चेअरमन, माजी आमदार स्व.डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटीलसाहेब यांची पुण्यतिथी श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारती समोर उभारण्यात आलेल्या पुर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करुन साजरी करण्यात आली.


 याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडीत गणपतराव आप्पासाहेब पाटील यांनी स्व .सा. रे. पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. तसेच स्व.दत्ताजीराव कदमआण्णांच्या पुतळ्यास व्हाईस चेअरमन अरुणकुमार शंकर देसाई यांनी पुष्पहार अर्पण केला. त्याचप्रमाणे स्व. दिनकरराव यादव यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास संचालक रणजित अशोक कदम व स्व. विश्वासराव घोरपडे सरकार यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील(भैय्या) यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच गणेश बेकरीचे संस्थापक आण्णासाहेब चकोते, नांदणी बँकेचे चेअरमन आण्णासाहेब लठ्ठे, शिरोळचे माजी उपसरपंच पृथ्वीराज यादव, नंदकुमार साखरे, सी. डी. पाटील, ऊस तोडणी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील-नरदेकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित सर्व संचालक व इतर मान्यवरांनी पुष्पकमल अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक अनिलकुमार यादव, शरदचंद्र पाठक, रघुनाथ पाटील, विश्वनाथ माने, बाबासो पाटील, शेखर पाटील,प्रमोद पाटील, इंद्रजित पाटील, अमर यादव, निजामसो पाटील, संचालिका श्रीमती विनया घोरपडे, सौ. यशोदा कोळी, सौ.संगिता पाटील (कोथळीकर), तज्ञ संचालक महेंद्र बागे, विजय सुर्यवंशी, निमंत्रीत संचालक मलकारी तेरदाळे, बाळासाहेब पाटील (हालसवडे), रावसाहेब नाईक, दरगू माने-गावडे, कामगार प्रतिनिधी प्रदिप बनगे तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील व कारखान्याचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. तसेच माजी आमदार उल्हासदादा पाटील, पंचगंगा कारखान्याचे संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील, शिरोळचे उपनगराध्यक्ष तातोबा पाटील, माजी उपनगराध्यक्ष योगेश पुजारी, नगरसेवक पंडीत काळे, एन. वाय. जाधव, माजी नगरसेवक विठ्ठल पाटील, शिरोळचे माजी सरपंच गजानन काळे, पिंटू फल्ले, शिवाजीराव देशमुख, जयसिंगपूरचे नगरसेवक

सर्जेराव पवार, संजय पाटील-कोथळीकर, मुसा डांगे, उद्योगपती अशोकराव कोळेकर, शिरोळ तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष दिलीपराव माने, अॅड. विश्वास पाटील, दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार व संचालक मंडळ,रावसाहेब गळतगे, जांभळीचे राजू पाटील, कामगार युनियनचे माजी अध्यक्ष नाना कदम, धोंडीराम दबडे, आण्णासाहेब गावडे-सर, आनंदराव माने-देशमुख, दिलीप पाटील- कोथळीकर, मयूरभाई नारेचनीया, श्री दत्त कामगार सोसायटी, कामगार कल्याण मंडळ, शर्करा औद्योगिक श्रमिक संघ या संस्थांचे पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते आणि कारखान्याचा कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Post a Comment

Previous Post Next Post