प्रेस मीडिया लाईव्ह :
नंदुरबार काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली शहरातील मुख्य चौकात पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ व महागाईच्या निषेधार्थ केंद्र शासना विरोधात भोंगा आंदोलन करण्यात आले.पेट्रोल, डिझेल गॅस दरवाढीमुळे महागाई आटोक्यात आणण्यासाठी केंद्रशासन असमर्थ ठरत असून जनतेला दिलेलं वचन भाजप सरकार पाळू शकलेले नाही. त्यामुळे त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. जनतेची दिशाभूल करणाऱ्या भाजप केंद्र सरकारचा काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार निषेध करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भोंग्यावर वाजविली भाषणाची क्लिप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर भाषणांमध्ये नागरिकांना पेट्रोल के दाम कम हुऐ की नही.. आप के जब मे थोडा बहुत पैसा बचने लगा की नही.. असे प्रश्न विचारले होते. त्या भाषणाच्या क्लिप भोंग्यामध्ये वाजवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारलेल्या प्रश्नांवर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाही उत्तर देत भोंगा आंदोलन केले.