राष्ट्रवादीच्या महिला नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर नमाज, हनुमान चालीसा, दुर्गा चालीसा, नवकार या मंत्रांचे पठण करण्याची परवानगी मागितली.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे घर 'मातोश्री'समोर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसा पठणाचा आग्रह धरला होता. मात्र जनतेच्या संतप्त भावनांनंतर त्यांची रवानगी तरुंगात करण्यात आली.आता राणा दाम्पत्यांच्या मागणीला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादीच्या महिला नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर नमाज, हनुमान चालीसा, दुर्गा चालीसा, नवकार या मंत्रांचे पठण करण्याची परवानगी मागितली. उत्तर मुंबई राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा फहमिदा हसन खान यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून वेळ मागितली आहे.


फहमिदा हसन पत्रात लिहितात की त्या नेहमी हनुमान चालीसा पाठ करते आणि तिच्या घरी दुर्गा पूजा करते. मात्र देशात ज्या प्रकारे महागाई आणि बेरोजगारी वाढत आहे, त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जागे करणे गरजेचे झाले आहे. त्यांचे म्हणणे आहे की जर रवी राणा आणि नवनीत राणा यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा वाचून फायदा होत असेल तर त्यांनी पंतप्रधान मोदींच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन नमाज, हनुमान चालीसा आणि दुर्गापाठ देशाच्या हितासाठी करायचा आहे.

फहमिदा हसन यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून म्हटले आहे की, 'मी तुम्हाला विनंती करते की मला देशाच्या लाडक्या पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर नमाज, हनुमान चालीसा, नवकार मंत्र, गुरु ग्रंथ आणि नोव्हिनो वाचण्याची परवानगी द्या. यासोबतच मला वेळ आणि दिवसाची माहिती द्या', असेही पत्रात लिहिले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post